भररस्त्यात महिलेच्या ड्रेसमध्ये शिरला जंगली उंदीर आणि नंतर .. : पहा व्हिडीओ

शेअर करा

सोशल मीडियावर काय कधी व्हायरल होईल याचा नेम राहिलेला नाही . काही लोकांना आयुष्यात नेहमी काहीतरी वेगळं आणि धाडसी कृत्य करण्याची इच्छा असते. हे लोक स्वतःला खतरो के खिलाड़ीच समजतात. यामुळे हे लोक विचित्र स्टंट कऱण्यासोबत भयंकर जंगली प्राण्यांच्या आजूबाजूलाही भटकत राहातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर एक भयंकर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर FailArmy नावाच्या एका पेजवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून कोणालाही भीती वाटेल. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक महिला पॉसम नावाच्या एका जंगली उंदराला प्रेमानं जवळ बोलवत असते. इतक्यात हा उंदीर तिच्या ड्रेसला येऊन चिटकतो आणि महिला त्याला बाहेर काढण्यासाठी उड्या मारू लागते. अत्यंत गमतीशीर असा हा व्हिडीओ आहे.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ रिल्सच्या स्वरुपात पोस्ट केला गेला असून आतापर्यंत 50 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. पॉसम हा जंगलांमध्ये आढळणारा एक जंगली उंदीर आहे. काही ठिकाणी त्याला ओपॉसम असंही म्हटलं जातं. साधारणपणे हे उंदीर चावत नाहीत. मात्र जेव्हा त्यांना धोका जाणवतो तेव्हा ते चावणं सोडत नाहीत. यांच्या संपर्कात आल्यानं माणसाला गंभीर आजारही होऊ शकतात. याच कारणामुळे रस्त्यावर आढळणाऱ्या आणि जंगली जनावरांपासून सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे.


शेअर करा