मोडकळीला आलेल्या घरात ‘ कामक्रीडा ‘ रंगात येताच स्लॅब खाली, तरुणाचा मृत्यू तर तरुणी …

शेअर करा

लपून छपून अनोळखी ठिकाणी जाऊन सेक्स करणं तरुण-तरुणीला चांगलंच महागात पडलं. अनैतिक शारीरिक संबंध ठेवत असताना अचानक घर कोसळल्याने तरुणाला जीव गमवावा लागला तर संबंधित तरुणीच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून ते जवळपास मोडले आहेत. या घडलेल्या या प्रकाराची परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे.

या सर्व प्रकार झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील करकोमा गावात शुक्रवार रात्री घडला. करकोमा गाावातील दशरथ भुइया यांच्या मुलाचे लग्न होते. या लग्नासाठी मेराल पोलीस ठाणे क्षेत्राच्या सिरहे गावातील एक तरुणी आली होती. शुक्रवारी रात्री लग्नाची वरात निघाली. वरातीसोबत सर्व कुटुंबीय गेल्याचा फायदा घेत तरुणीनं तिच्याच गावातील तिचा बॉयफ्रेंड सुरेंद्र मेहता उर्फ बाबूरामला लग्नाच्या ठिकाणी बोलावून घेतलं.

दशरथ भुइया यांच्या घरापासून काही अंतरावर वीज वितरण सब स्टेशनच्या जवळ एक मोडकळीस आलेलं घर होतं. तेथे हे दोघे पोहचले आणि सेक्स करण्यास सुरुवात केली. दरम्यान यांचा सेक्स सुरू असताना पावसामुळं कमकुवत झालेल्या या घराचा स्लॅब आणि भिंत कोसळली आणि हे दोघेही त्या अवस्थेत खाली पडले. सदर घटनेत तरुणीचा प्रेमी बाबूरामचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणीचे दोन्ही पाय मोडले आहेत.

भिंत कोसळल्यानंतर या तरुणीनं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली, त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी येवून तिला मलब्याखालून बाहेर काढले आणि तरुणाला देखील मलब्याबाहेर काढले मात्र त्याचा मृत्यू झाला होता. तरुणीला काही वेळ संबंधित नातेवाईकांच्या घरीच सुरक्षित ठेवण्यात आले तर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तरुणीला तरुणाचे निधन झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला असून नंतर तिलाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


शेअर करा