.. अखेर त्या दोघींनी तडजोड करून प्रियकराची केली ‘ अशी ‘ वाटणी

शेअर करा

सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या आणि त्यानंतर लिव्ह इनमध्ये राहत असताना गर्भवती राहिलेल्या प्रेयसीच्या लहान मुलाला अखेर वडिलांचं छत्र लाभलं आहे. प्रियकराचा शोध घेत घेत आसामहून उत्तर प्रदेशातल्या रामपूरमध्ये पोहोचलेल्या प्रेयसीचा निकाह तिच्या प्रियकरासोबत संपन्न झाला. मात्र प्रियकर आधीपासूनच विवाहित असल्यानं प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. त्यानंतर पोलिसांसमोरच दोघींनी पतीची वाटणी करून घेतली.

दोन्ही पत्नींना पती समान वेळ देईल आणि त्याचसोबत आई वडिलांचीदेखील काळजी घेईल असा अनोखा सामंजस्य करार पोलीस ठाण्यात झाला. हा प्रकार पाहून पोलीसदेखील चकित झाले. पतीला दोन्ही पत्नींना सारखाच वेळ देऊन त्यांच्यापासून झालेल्या मुलांची काळजी घ्यावी लागेल. यासोबतच तो आई वडिलांकडेही लक्ष देईल, असा निर्णय दोघींनी घेतला. दोन्ही पत्नींनी पोलिसांसमोरच पतीची वाटणी केली. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी पती पहिल्या पत्नीसोबत असेल. गुरुवार, शुक्रवार, शनिवार तो दुसऱ्या पत्नीसोबत राहील आणि रविवारी आई वडिलांना वेळ देईल, अशा प्रकारची वाटणी पोलीस ठाण्यात करण्यात आली.

मूळचा अझीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोंकपुरी टांडाचा रहिवासी असलेला तकलीम अहमद नावाचा तरुण कामासाठी चंदिगढला गेला होता. दीड वर्षांपूर्वी त्याची फेसबुकच्या माध्यमातून आसामच्या तरुणीशी मैत्री झाली. पुढे ते दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर अहमदनं तिथून पळ काढला. त्याला शोधत तरुणी अझीमनगरमध्ये आली. तेव्हा तिला अहमद विवाहित असल्याचं समजलं. यानंतर तिचा अहमदसोबत निकाल लावण्यात आला.

काय आहे प्रकरण ?

आरोपीचं नाव तकमील अहमद असं आहे. खरंतर तो उत्तर प्रदेशातील रामपूरच्या डोनकपुरी टांडा गावाचा रहिवासी आहे पण तो चंदिगड येथे हेअर कटिंगचं काम करायचा. तिथे राहत असताना त्याची फेसबुकवर आसामच्या एका तरुणीसोबत मैत्री झाली. याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्याने त्या तरुणीला आसाममधून चंदिगडला बोलावलं. दोघं एकत्र राहू लागले. त्यांनी लग्न केलं नाही मात्र एकत्र राहायला सुरु केले. याच प्रेमातून तरुणी गर्भवती झाली. तरुणीने अहमदला याबाबत माहिती दिली

तकमील अहमदने प्रेयसीला प्रसुतीसाठी तिच्या माहेरी म्हणजे आसामला जाण्यास सांगितलं. त्यानुसार तरुणी आसामला गेली. पण त्यानंतर अहमद चंदिगडला राहिला नाही. तो तरुणीला न सांगता चंदीगढवरून पळून पुन्हा त्याच्या रामपूर येथील गावात आला आणि त्याने आपला फोन बंद केला. तरुणीने अहमदला फोन करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

संतापलेली तरुणी अखेर काही महिन्यांनी महिला चंदिगडला आली. तिथे तिला माहिती पडलं की, तिचा प्रियकर तिथून फरार झाला आहे. यानंतर पीडित तरुणी पोलीस ठाण्यात गेली. त्यानंतर वन स्टॉप सेंटरच्या मदतीने तरुणी आपल्या सहा महिन्यांच्या बाळासोबत आरोपीच्या घरी म्हणजे उत्तर प्रदेशात रामपूर येथील गावात पोहोचली.

तरुणी तिच्या प्रियकराच्या घरी पोहोचली तेव्हा ती थक्क होऊन गेली. तिथे तिला जी काही माहिती मिळाली त्याने तिला मोठा धक्का बसला. ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती त्याचं आधीच एका महिलेसोबत लग्न झालेले होतं. याशिवाय त्याला पहिल्या पत्नीकडून दोन मुलं होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तरुणीने मोठा आकाडतांडव केला. गावातील नागरिकांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे आरोपी प्रियकराने देखील आपली भूमिका मांडली आहे. चंदिगडमध्ये व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे आपण गावी आलो, असं स्पष्टीकरण त्याने दिलं. तसेच तो पहिल्या पत्नीसह पीडित तरुणीसोबत राहण्यास तयार आहे, अशी भूमिका त्याने मांडली आहे. मात्र त्याची पहिली पत्नी त्याच्यासोबत राहण्यास तयार नव्हती मात्र अखेर तडजोड होऊन पतीचे वाटप दोन्ही बायकांनी करून घेतले असल्याने प्रकरणावर पडदा पडला आहे .


शेअर करा