चल तुला मॉलमध्ये नोकरीला लावते म्हणणाऱ्या दाम्पत्याच्या डोक्यात होता ‘ असा ‘ काही प्लॅन ..

शेअर करा

ग्रामीण भागातील तरुणींना फूस लावून शहरात आणायचे आणि मग वेश्याव्यवसायास प्रवृत्त करायचे असा आरोप असलेल्या एका दाम्पत्यास पुण्यातील हडपसर पोलिसांनी नुकतीच अटक केली असून दिलीप सखाराम पवार व त्यांची पत्नी अरुणा (रा. पोखरी, ता. जि़. बुलढाणा )अशी अटक केलेल्याची नावे आहेत. आपल्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलीला त्यांनी चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून पुण्यात आणले होते

दिलीप सखाराम पवार व त्याची पत्नी अरुणा या दोघांनी जास्त पैसे कमविण्याची स्वप्ने दाखवून पुण्याला आणले. आरोपी अरुणा ही पुण्यातील एका प्रसिद्ध मॉलमध्ये काम करते, तुला देखील तिथे कामाला लावते असे सांगून ह्या मुलीला पुण्यात आणले होते . विशेष म्हणजे पीडित मुलगी ही आरोपी दाम्पत्याची नातेवाईक आहे . जबरदस्ती करत तिच्या मनाविरुद्ध वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे़.

आरोपी महिला ही शहरातील एका नामांकित मॉलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती. तिचा पती पुण्यात बांधकाम व्यावसायात काम करतो. त्यांनी पीडित मुलीच्या घरच्यांना तिला पुण्यात चांगली नोकरी लावतो, असे सांगितले मात्र या दोघांबद्दल मुलीच्या आईवडिलांना शंका असल्याने त्यांनी नकार दिला होता मात्र त्या मुलीला फूस लावण्यात हे दाम्पत्य यशस्वी झाले आणि आईवडिलांना न सांगता परस्पर त्यांनी मुलीला पुण्यात आणले आणि आणल्यानंतर तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले.

बुलढाणा पोलिसांत ह्या प्रकारची तक्रार दाखल होताच त्यांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला आणि तीन दिवस ह्या दाम्पत्याचा पुणे पोलिसांनी शोध घेतला. मांजरी येथे एका ठिकाणी पवार थांबला असल्याचे समजल्यावर सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व त्यांच्या पथकाने पवार दाम्पत्याला पकडले व अधिक तपासासाठी दोघांना बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.


शेअर करा