राष्ट्रवादी सत्तेत म्हणून का ? नगरचे पोलीस कारवाईसाठी दुसऱ्या तालुक्यात..

शेअर करा

नगर येथील पोलीस पथकाने चक्क श्रीगोंदा तालुक्यात जाऊन शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यावरील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सोनू कोथंबिरे यांच्या शेतातील खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केली. यात दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आणि मुंबईतील साईनाथ रवींद्र मोकाशी याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी सहा दुचाकी दोन हजाराची रोकड व जुगाराचे साहित्य असा एकूण दोन लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल घटनस्थळावरून हस्तगत केला तर पाच जण यावेळी निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन अंधारात पसार झाले. मात्र लिंबोणीच्या बागेत लपलेला साईनाथ रवींद्र मोकाशी याला पोलिसांनी अटक केली. श्रीगोंदा पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हा प्रकार सुरू होता तरीदेखील पोलिसांनी कुठलीही कारवाई अद्यापपर्यंत केली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे

श्रीगोंदा पोलीस कुठलीही कारवाई केली नाही म्हणून त्यांची भूमिका चौकशी करण्यायोग्य आहे . नगरच्या पोलीस पथकाने एक प्रकारे स्थानिक पोलिसांना चेकमेट दिला अशी चर्चा आता सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित सहाय्यक उपनिरीक्षक गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल परदेशी किरण आवारे हे पोलीस पथकात होते.


शेअर करा