‘ ठो..ठो ‘आवाज करणाऱ्या ११४ सायलेन्सरवर भर रस्त्यात रोडरोलर फिरवला , कुठे घडला प्रकार ?

  • by

 10 total views

रॉयल एन्फिल्ड म्हणजेच बुलेटच्या कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरवर उल्हासनगरात जोरदार कारवाई करण्यात आली. पोलिसांनी बुलेटचे सायलेन्सर काढून त्यावरून चक्क रोडरोलर फिरवून सायलेन्सरचा चक्काचूर केला. विशेष म्हणजे उल्हासनगरात भर शिवाजी चौकात ही कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी तब्बल 114 बुलेट गाड्यांच्या सायलेन्सरचा चक्काचूर केला. यानंतर तरी असे सायलेन्सर बसवणारे उपद्रवी सुधारतील अशी आशा करू यात ..

नेमकं प्रकरण काय ?

बुलेट या दुचाकीला कंपनीने दिलेलं सायलेन्सर काढून अनेकजण मॉडिफाईड सायलेन्सर टाकतात. या सायलेन्सच्या आवाजामुळे अक्षरशः कानठळ्या बसतात आणि ध्वनी प्रदूषण सुद्धा होतं. अचानकपणे फटाक्यासारखा आवाज तसेच अचानक निघणारा जाळ , अशी अनेक वैशिष्ट्ये (? ) अशा सायलेन्सरमध्ये असतात. अशा सायलेन्सरला वाहतूक विभागाची कोणतीही परवानगी नाही. याबाबत हिराली बुफाऊंडेशन या संस्थेच्या वतीनं सरिता खानचंदानी यांनी मोठा पाठपुरावा केला होता. यानंतरच या सायलेन्सर विरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात आली मात्र कायदेशीर बाबीसाठी देखील पाठपुरावा करावा लागतो, हे देखील चुकीचे आहे .

उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी मागील काही दिवसात धडक कारवाई करत तब्बल 114 बुलेट गाड्यांचे सायलेन्सर जप्त केले होते. या सर्व सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले आहे. उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या अतिशय गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर हे सायलेन्सर ठेवून त्यावरून रोलर फिरवण्यात आला. लोकांना ही कारवाई कळावी, यासाठी हे मध्यवर्ती ठिकाण निवडण्यात आलं. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिक मोठ्या प्रमाणात स्वागत करत आहेत.

या कारवाईवेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्ता तोटेवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्यासह वाहतूक पोलीस मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कारवाईमुळे उल्हासनगरात ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांना संदेश जाईल आणि भविष्यात हे सायलेन्सर कुणी बसवणार नाही, असा विश्वास यावेळी पोलीस उपयुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

यापुढे जे गॅरेज चालक असे सायलेन्सर लावून देतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. तर उल्हासनगरात शहर हे सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असणारं शहर असून या कारवाईनंतर आता तरी शहरातलं ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा हिराली फाऊंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी व्यक्त केली.

लातूरमध्येही झाली होती अशीच कारवाई

कर्कश्श आवाज करत रस्त्यांवरुन धावणाऱ्या जवळपास 300 बाईक्सवर लातूर पोलिसांनी अशेच कारवाई केली होती. कर्कश्श फायरिंगसाठी लावण्यात आलेले सायलेन्सर वाहतूक पोलिसांनी चक्क रोड रोलरखाली चिरडले होते . त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पूर्वी काढून टाकलेले सायलेन्सर पुन्हा विकले जाऊ लागल्याने सायलेन्सर चिरडण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता .

कर्कश्श हॉर्न आणि कानाला त्रास होईल, असे सायलेन्सर काढून टाकण्याचे आवाहन करुनही अनेक दुचाकीस्वार आपल्या बाईकला मोठा आवाज असणारे सायलेन्सर लावून लातूर शहरात फिरत होते. दवाखाना, शाळा, सरकारी कार्यालये, बाजारपेठ अशा सगळ्या ठिकाणी कर्कश्श आवाजाच्या बाईक उडवत अनेक जण फिरत होते. वाहतूक पोलिसांनी या बाईक ताब्यात घेऊन सायलेन्सर चक्क रोड रोलरखाली चिरडून टाकले होते .

दादा, मामा, काका, साई, राम, पवार अशा नावांचे नंबर जुळवलेली वाहनं वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात, मात्र आपणसुद्धा असं वाहन वापरत असाल तर आताच सावधान व्हा, कारण ज्यांच्या वाहनांच्या नंबर प्लेट फॅन्सी आहेत अशा वाहन चालक अन् दुचाकीस्वारांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी खास मोहीम उघडली आहे.ज्यांच्यावर आधी कारवाई झालेली आहे, तरीसुद्धा ज्यांनी नंबर प्लेट्स बदललेल्या नाहीत, अशा लोकांची वाहनंही जप्त करण्यात आलेली आहेत.

मोटार वाहन कायदा-1988 आणि मोटार वाहन नियम-1989 नुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहेत. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात. स्वतः आणि गाडीची ओळख लपवण्यासाठी गाडीच्या क्रमांकाला आई, भाईचा आकार देणाऱ्या वाहनचालकांचा सुळसुळाट आजकाल सगळीकडे वाढला असून आता वाहतूक पोलीस विभागाने त्याविरोधात कंबर कसली आहे .