नागपूर हत्याकांड , अखेर तपासात ‘ नको तो ‘ अँगल आला समोर

  • by

 10 total views

नागपुर इथे एक हत्याकांडाची घटना समोर आली होती ज्यात एका व्यक्तीने पत्नी, मुलगा, मुलगी, सासूसह मेहुणीची हत्या करत नंतर स्वत:ला संपवलं होत. या हत्याकांडात आता आणखी माहिती समोर आली असून विवाहबाह्य अनैतिक संबंध देखील असल्यानेच हे हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे .तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बागल आखाडा परिसरात घडलेली ही घटना घडली होती. आरोपी आलोक माथुरकर याने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथेच थोड्या अंतरावर राहणाऱ्या सासरी जाऊन सासू आणि मेहुणीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पुन्हा स्वत:च्या घरी परतला आणि गळफास घेतला.

आलोक माथुरकर याने १५ वर्षांपूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने स्वकीयांनी आलोकला बहिष्कृत केले होते. त्याची पर्वा न करता त्याने कष्टातून संसार फुलवला होता. त्याचे पत्नी विजयावर खूप प्रेम होते. मुलगा आणि मुलगी तर त्याला जीव की प्राणच वाटायचे मात्र मेव्हणीवरही त्याचा तेवढाच जीव होता. नातेवाईकांसोबत तो सरळसाधेपणाने वागायचा मात्र बरेच वर्षे त्याच्यासोबत आप्तांपैकी अनेक जण बोलत नव्हते.

आलोकच्या लग्नाच्या वेळी त्याची मेव्हणी आमिषा केवळ ५ ते ७ वर्षांची होती. ती वयात येण्यापूर्वीपासूनच आलोककडे राहायची. या दोघांनी अनैतिक संबंधातून नात्याच्या सर्व मर्यादा तोडल्या. मात्र दुप्पट वयाच्या भावजीसोबत ती रमणे शक्य नव्हते. लैंगीक संबंधाची चटक लागल्याने तिने अनेक मित्र बनविले. त्यामुळे अलोक याचा क्रोध व तिच्या आयुष्यातील हस्तक्षेप वाढत गेला. मारहाणीपर्यंत प्रकरण गेले. तो हक्क दाखवू लागल्याने अमिषा देखील त्वेषात आली.

रविवारी रात्री ११.१५ च्या सुमारास तिने आपल्या मित्राला फोन करून त्याला ( भावजी ) आवर अन्यथा परिणाम गंभीर होतील, असे सांगून टाकले. त्यानंतर सासू आलोकच्या घरी पोहचली. तेथे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले अन् त्याच्या संतापाचा भडका उडाला. पत्नीने त्याला आमिषाच्या जीवनात ढवळाढवळ कशाला करतो, असे विचारले अन् भडका उडाला. त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. आमिषाच याला कारणीभूत असल्याचे त्याच्या डोक्यात गेले अन् त्याने खूनच करण्याचा निर्णय घेतला.

आरोपी आलोक सासऱ्याच्या घरी पोहचला. त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याचे पाहून शरणागती पत्करलेल्या आमिषावर त्याने बलात्कार केला, नंतर तिचा गळा कापला. अर्धनग्न अवस्थेत आमिषाचा मृतदेह सोडून तो निघण्याच्या तयारीत असतानाच सासू बाहेरून दारावर धडकली. त्यामुळे त्याने सासूचीही गळा कापून हत्या केली इतके सगळे करूनही त्याची वासना मिटली नाही.

स्वतःच्या घरी आल्यावर मध्यरात्रीनंतर त्याने पत्नीसोबत जबरदस्तीने शय्यासोबत करण्याचा प्रयत्न केला. रक्ताने माखलेले कपडे बघून तिने नकार दिल्यामुळे, त्याने विजयाचा धारदार शस्त्राने गळा चिरला. तिने किंकाळी फोडल्याने मुले जागी झाली. परीने विरोध केला असावा. त्यामुळे त्याने तिचे हातपाय बांधले. तरीदेखील तिचा विरोध सुरू असल्यामुळे डोक्यावर हातोडा हाणून तिलाही रक्ताच्या थारोळ्यात लोळविले आणि आता मुलालाच कशाला ठेवायचे म्हणून त्याने त्याच्या तोंडावर उशी दाबून त्यालाही संपविले. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे आणि प्राथमिक तपासावरून हा निष्कर्ष काढला आहे.

आलोक घरात शिरताच आमिषाने तिच्या मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग ॲप सुरू केले. त्यामुळे आमिषावर बलात्कार करण्यापूर्वी तसेच नंतर आरोपीने तिच्याशी घातलेला वाद, त्यानंतर तिची आणि तिच्या आईची केलेली हत्या आणि या संपूर्ण घटनाक्रमात दरम्यान झालेले या तिघांमधील वाद, किंकाळ्या आमिषाच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झालेले आहे. हे रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहे.

आलोकने या हत्याकांडाचे कट-कारस्थान आधीच रचले होते, याची पुष्टी देणारा महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती मध्यरात्री लागला. आरोपी आलोकने ऑनलाइन पोर्टलवरून चाकूचा एक सेट मागवला होता. यात विविध प्रकारचे चाकू होते. त्याने घरगुती वापर करायचा आहे, असे सांगून आपल्या मुलीच्या नावावर हा चाकूचा सेट मागविला होता. तीन दिवसापूर्वीच त्याची डिलिव्हरी त्याला झाली होती, असेही स्पष्ट झाले असून या सेट मधील एक धारदार चाकू त्याने पत्नी, मेहुणी आणि सासूचा गळा कापण्यासाठी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे.