नागपूर हत्याकांड : आलोक आणि आमिषात खूनापूर्वी झालेला ‘ हा ‘ संवाद पोलिसांच्या हाती

  • by

 12 total views

नागपूरच्या त्या हत्याकांडात रोज नवीन खुलासे येत असून अलोक मातुरकर याची मेहुणी अमिषा हिचे तिच्या दाजीसोबत (अलोक सोबत ) अनैतिक संबंध होते व त्यातूनही ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे . मयत अमिषा हिने अलोक तिच्या रूममध्ये आल्यावर मोबाईलवर ऑडिओ रेकॉर्डिंग सुरु ठेवले होते त्यात या दरम्यान झालेले धक्कादायक संभाषण रेकॉर्ड झाले असून त्यादरम्यान काय काय घडले यातील संभाषण देखील आता पोलिसांच्या हाती लागलेले आहे .

आलोकने गळा घोटल्यामुळे अमिषाची जीभ बाहेर आली होती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. तिचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. तर, अंगात सैतान संचारलेला आलोक ती लवकर मरावी म्हणून वाट बघत होता. आतल्या खोलीत असलेली सासू या दोघांच्या खोलीत आली तेव्हा तो म्हणाला, बघा ना मरत पण नाही… अन् नंतर त्याने चाकूने अमिषाचा गळा चिरला पुढे त्याने सासुचीची हत्या केली आणि पत्नी व मुलांचीही हत्या करून स्वतःही आत्महत्या केली.

अमिषाने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्यामुळे तो क्षुब्ध झाला होता. ‘तू मेरी नही तो किसी और की भी नही’ असे म्हणत तिला संपविण्याचा त्याने निर्णय घेतला होता. आलोक रविवारी रात्री अमिषाच्या घरी गेला. त्याची देहबोली बघून अमिषाला धोका लक्षात आला होता. पोलिसांना अमिषाचा मोबाईल सापडला असून त्यातील ऑडिओ क्लीपवरून आलोक घरी आल्यापासून दोघींच्या हत्येचा घटनाक्रम रेकॉर्ड झाला आहे. २७ मिनिटांची ही क्लीप आहे.

काय आहे ह्या क्लिपमध्ये ?

अमिषा – तू आला का… ये … आता लाजतोस कशाला …
(दोघांचे हसणे खिदळणे.. एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव… शरीरसंबंधाची तयारी.. काही वेळानंतर…)
आलोक – तू माझी पोलिसांकडे तक्रार का केली…?
अमिषा – म्हणजे काय, मी का तुझी (…) आहे का? मी माझ्या मनाची मालकीण आहे. तू आपले काम कर…
आलोक – तू चांगली वाग…
अमिषा – तू चांगला वाग, अन्यथा पुन्हा तुझी तक्रार करेन…
(अमिषाचे हे वाक्य त्याच्या जिव्हारी लागते अन् तो अचानक हिंसक झाला. दोघे एकमेकांना अश्लील शिव्या देतात. तो मारहाण करून अर्धनग्न अवस्थेतील अमिषाचा गळा घोटतो. ती आचके देत असते. तेवढ्यात त्या खोलीत अमिषाची आई लक्ष्मीबाई येते. त्यांना बघून ही मरत का नाही…असा सवाल आलोक करतो. अमिषाला संपवतो.)
लक्ष्मीबाई – जावई … तुम्ही हे काय केले…
आलोक – तुम्ही ओरडू नका, लोक जागतील.. गप्प राहा… त्याचक्षणी लक्ष्मीबाईंची किंकाळी (त्याने त्यांचाही गळा कापला).

काय आहे प्रकरण ?

नागपुर इथे एक हत्याकांडाची घटना समोर आली होती ज्यात एका व्यक्तीने पत्नी, मुलगा, मुलगी, सासूसह मेहुणीची हत्या करत नंतर स्वत:ला संपवलं होत. या हत्याकांडात आता आणखी माहिती समोर आली असून विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्यानेच हे हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे .तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बागल आखाडा परिसरात घडलेली ही घटना घडली होती. आरोपी आलोक मातुरकर याने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथेच थोड्या अंतरावर राहणाऱ्या सासरी जाऊन सासू आणि मेहुणीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पुन्हा स्वत:च्या घरी परतला आणि गळफास घेतला.

आलोक मातुरकर याने १५ वर्षांपूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने स्वकीयांनी आलोकला बहिष्कृत केले होते. त्याची पर्वा न करता त्याने कष्टातून संसार फुलवला होता. त्याचे पत्नी विजयावर खूप प्रेम होते. मुलगा आणि मुलगी तर त्याला जीव की प्राणच वाटायचे मात्र मेव्हणीवरही त्याचा तेवढाच जीव होता. नातेवाईकांसोबत तो सरळसाधेपणाने वागायचा मात्र बरेच वर्षे त्याच्यासोबत आप्तांपैकी अनेक जण बोलत नव्हते.

आलोकच्या लग्नाच्या वेळी त्याची मेव्हणी आमिषा केवळ ५ ते ७ वर्षांची होती. ती वयात येण्यापूर्वीपासूनच आलोककडे राहायची. या दोघांनी पुढे अनैतिक संबंधातून नात्याच्या सर्व मर्यादा तोडल्या. मात्र दुप्पट वयाच्या भावजीसोबत आमिषा रमणे शक्य नव्हते. लैंगीक संबंधाची चटक लागल्याने तिने अनेक मित्र बनविले. त्यामुळे अलोक याचा क्रोध व तिच्या आयुष्यातील हस्तक्षेप वाढत गेला. तो हक्क दाखवू लागल्याने अमिषा देखील त्वेषात आली.

रविवारी रात्री ११.१५ च्या सुमारास तिने आपल्या मित्राला फोन करून त्याला ( भावजी ) आवर अन्यथा परिणाम गंभीर होतील, असे सांगून टाकले. त्यानंतर सासू आलोकच्या घरी पोहचली. तेथे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले अन् त्याच्या संतापाचा भडका उडाला. पत्नीने त्याला आमिषाच्या जीवनात ढवळाढवळ कशाला करतो, असे विचारले अन् भडका उडाला. त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. आमिषाच याला कारणीभूत असल्याचे त्याच्या डोक्यात गेले अन् त्याने खूनच करण्याचा निर्णय घेतला.

आरोपी आलोक सासऱ्याच्या घरी पोहचला. त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याचे पाहून शरणागती पत्करलेल्या आमिषावर त्याने बलात्कार केला, नंतर तिचा गळा कापला. अर्धनग्न अवस्थेत आमिषाचा मृतदेह सोडून तो निघण्याच्या तयारीत असतानाच सासू बाहेरून दारावर धडकली. त्यामुळे त्याने सासूचीही गळा कापून हत्या केली इतके सगळे करूनही त्याची वासना मिटली नाही.

स्वतःच्या घरी आल्यावर मध्यरात्रीनंतर त्याने पत्नीसोबत जबरदस्तीने शय्यासोबत करण्याचा प्रयत्न केला. रक्ताने माखलेले कपडे बघून तिने नकार दिल्यामुळे, त्याने विजयाचा धारदार शस्त्राने गळा चिरला. तिने किंकाळी फोडल्याने मुले जागी झाली. परीने विरोध केला असावा. त्यामुळे त्याने तिचे हातपाय बांधले. तरीदेखील तिचा विरोध सुरू असल्यामुळे डोक्यावर हातोडा हाणून तिलाही रक्ताच्या थारोळ्यात लोळविले आणि आता मुलालाच कशाला ठेवायचे म्हणून त्याने त्याच्या तोंडावर उशी दाबून त्यालाही संपविले. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे आणि प्राथमिक तपासावरून हा निष्कर्ष काढला आहे.

आलोक घरात शिरताच आमिषाने तिच्या मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग ॲप सुरू केले. त्यामुळे आमिषावर बलात्कार करण्यापूर्वी तसेच नंतर आरोपीने तिच्याशी घातलेला वाद, त्यानंतर तिची आणि तिच्या आईची केलेली हत्या आणि या संपूर्ण घटनाक्रमात दरम्यान झालेले या तिघांमधील वाद, किंकाळ्या आमिषाच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झालेले आहे. हे रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहे.

आलोकने या हत्याकांडाचे कट-कारस्थान आधीच रचले होते, याची पुष्टी देणारा महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती मध्यरात्री लागला. आरोपी आलोकने ऑनलाइन पोर्टलवरून चाकूचा एक सेट मागवला होता. यात विविध प्रकारचे चाकू होते. त्याने घरगुती वापर करायचा आहे, असे सांगून आपल्या मुलीच्या नावावर हा चाकूचा सेट मागविला होता. तीन दिवसापूर्वीच त्याची डिलिव्हरी त्याला झाली होती, असेही स्पष्ट झाले असून या सेट मधील एक धारदार चाकू त्याने पत्नी, मेहुणी आणि सासूचा गळा कापण्यासाठी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे.