अहमदनगर महापौरपदासाठी सेना-राष्ट्रवादीच ‘ असं ‘ ठरलय तर भाजपची भूमिका काय ?

शेअर करा

अहमदनगर महापौर पदासाठी शिवसेना सोमवारी (28 जून) अर्ज दाखल करणार आहे. शिवसेनेकडून रोहिणी शेंडगे या महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सेनेकडे महापौरपद, तर राष्ट्रवादीकडे उपमहापौरपद असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. येत्या 30 तारखेला महापौरपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेसची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे तसेच भाजपकडे उमेदवार नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे

अहमदनगर महापालिकेवर सध्या राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपचा महापौर आहे. अहमदनगरचे महापौर पद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असल्याने गेल्या महिन्यात अहमदनगरमधील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापही उपस्थित होते. या बैठकीत महापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यावर एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे.

अहमदनगर महापालिकेत 68 नगरसेवक आहेत. त्यात श्रीपाद छिंदमचं पद रद्द झाल्याने सध्या 67 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत. शिवसेना- 23 राष्ट्रवादी-18 भाजप-15 काँग्रेस-5 बसपा-4 सपा-1 अपक्ष-2 असे पक्षीय बलाबल आहे .

अहमदनगर महापालिकेत बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत. अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत 2018 मध्ये भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले होते. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. पहिल्या क्रमांकावर असूनही शिवसेनेला आपला महापौर बनवण्यात अपयश आले होते मात्र आता मुख्यमंत्रीच शिवसेनेचा असल्याने समीकरणे बदललेली आहे .

२०१८ ला काय घडलं होत ?

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ पदरात पाडून घेतलं.

शिवाजी कर्डीले यांच्या अथक प्रयत्नानंतर भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली. सासरे शिवाजी कर्डिलेंना जावई राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांनी मदत केली आणि भाजपला महापौर पदावर बसवले .

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी युती केल्यामुळे काँग्रेसच्या 5 नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार घातला. त्यामुळे भाजपचा मार्ग आणखी सुकर झाला. 68 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत 35 ही मॅजिक फिगर होती. तिसऱ्या नंबरवर राहूनही शिवाजी कर्डिले यांनी महापौर भाजपचाच होईल, असा दावा यापूर्वीच केला होता. ते त्यांनी करून दाखवलं होत.


शेअर करा