
कोरोनाच्या संसर्गामुळे नगर जिल्ह्याचा समावेश स्तर तीन मध्ये झाल्याने जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू झालेले आहेत, त्यानुसार रविवारपासून दिनांक 27 पासून सायंकाळी पाच नंतर सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय सर्व व्यवहार, आस्थापना दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहतील असे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शनिवारी दिनांक 26 रोजी याबाबत आदेश काढले आहेत. पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडवरील रुग्णांचे प्रमाण याच्या आधारे निर्बंध स्तर जाहीर करण्यात आले होते त्यात नगर जिल्हा क्रमांक एक मध्ये असल्याने सहा जून पासून जिल्ह्यातील सर्व निर्बंध उठवण्यात येऊन व्यवहार सुरळीत झाले होते परंतु 20 दिवसानंतर नगर जिल्ह्याचा समावेश पुन्हा स्तर 3 मध्ये झाला असल्याने नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
काय आहेत नवीन निर्बंध ?
- हॉटेल व रेस्टॉरंट 50 टक्के संमती सह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी चार वाजेपर्यंत, दुपारी चार नंतर केवळ पार्सल सुविधा सुरू तर शनिवार व रविवार केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्यात येईल.
- सार्वजनिक ठिकाणे खुली मैदाने सायकलिंग व मॉर्निंग वॉक सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत
- खाजगी आस्थापना व कार्यालय दुपारी चार वाजेपर्यंत
- मैदानावरील खेळ सकाळी पाच ते सकाळी नऊ व संध्याकाळी सहा ते रात्री नऊ
- सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के मर्यादेसह
- विवाह समारंभ पन्नास लोकांच्या उपस्थितीत
- अंत्यविधी वीस लोकांच्या उपस्थितीत
- स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थांच्या बैठका निवडणूका व वार्षिक सभा क्षमतेच्या 50% उपस्थित
- बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या मजुरांकरवी किंवा कामगारांना चार वाजता सोडले बंधनकारक राहील
- कृषी संबंधित दुकाने व स्थापना सकाळी सात ते दुपारी 4
- ई-कॉमर्स वस्तू व सेवा नियमितपणे सुरू राहतील
- जिम सलून ब्युटी पार्लर स्पा व वेलनेस सेंटर सकाळी सात ते दुपारी 4
- सार्वजनिक बस वाहतूक शंभर टक्के क्षमतेने सुरू
- कार्गो वाहतूक केवळ तीन व्यक्ती सह नियमितपणे सुरू राहील
- आंतरजिल्हा प्रवास खाजगी बस कार व टॅक्सी नियमितपणे सुरू मात्र स्तर पाच मधील जिल्ह्यात जाण्याकरता निर्बंध तसेच तिथे थांबणार असाल तरी ई-पास
- उत्पादन घटक व कंपन्या नियमितपणे सुरू राहतील
- नगरच्या ताज्या बातम्यांसाठी आमचा नंबर +91 9158093665 आपल्या व्हाट्सएप्प ग्रुपला ऍड करा