तंबाखू खाणाऱ्यांना कोरोनाचा धोका कमी कि जास्त ? , न्यायालय म्हणाले…

शेअर करा

धूम्रपान किंवा तंबाखू खाणाऱ्या लोकांना कोरोनापासून धोका नसल्याचा खुलासा सीएसआयआर ने अर्थातच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं केला आहे. तंबाखूजन्य पदार्थातील निकोटीन नावाचा पदार्थ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचा खुलासा सीएसआयआरच्या एका अहवालात करण्यात आला आहे. या अहवालाचा दाखला देत काही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे व्यापारी आणि विक्रेत्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांमुळे खरंच कोरोना रोखला जाऊ शकतो का? याबाबत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे न्यायालयात पोहचले आहेत.

तंबाखूमधील निकोटीन घटक कोरोनाला प्रतिबंध करण्यास परिणामकारक ठरते, असा दावा करणाऱ्या अहवालाचा दाखला देत तंबाखूजन्य पदार्थांचे व्यापारी आणि विक्रेत्यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. सीएसआयआरच्या अहवालानुसार तंबाखू कोरोना विषाणूच्या लढाईत रामबाण ठरत असेल, तर देशात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणली जाऊ नये, अशी मागणी देखील संबंधित व्यापाऱ्यांनी न्यायालयात केली आहे.

सीएसआयआरच्या अहवालातील दाव्यात तथ्य असल्यास केंद्र सरकारनं सिगरेटच्या पाकिटांवरून आरोग्याबाबतचा वैधानिक इशारा हटवायला हवा, असा खोचक टोलाही न्यायालयानं लागावला आहे. तूर्तास आपल्या या अजब दाव्याबद्दल वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनंअद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळे तंबाखू खाणारे कोरोना विषाणूपासून खरंच सुरक्षित आहेत का? याचा संभ्रम कायम राहणार आहे.


शेअर करा