पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती अन भावाची एका व्यक्तीला अमानुष मारहाण , काय आहे कारण ?

शेअर करा

भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाने त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या रहिवाशाला मारहाण केल्याचा आरोप आहे. पुणे शहरातील औंध परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. औंधच्या भाजप नगरसेविका अर्चना मुसळे यांचे पती मधुकर मुसळे आणि भावावर मारहाणीचा आरोप आहे.मुसळे या औंध परिसरातील क्लोरियन पार्क या इमारतीत वास्तव्यास आहेत. मारहाण झालेली व्यक्तीही याच इमारतीत राहत असल्याची माहिती आहे.

काय आहे व्हिडीओत ?

“सोसायटीत आपली बदनामी करणारी पत्र का वाटली? त्यावर तुझीच सही आहे ना?” असा जाब मुसळे विचारत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ मारहाणीसोबतच शिवीगाळ झाल्याचंही ऐकू येत आहे. तर “मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही. सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये मी सांगेन” असं संबंधित रहिवासी बोलताना ऐकू येतं मात्र भाजप नगरसेविकेच्या पतीने त्या व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप आहे.

पुण्यातील चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दुसरीकडे अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीच्या आदल्या रात्रीच शिवसेनेच्या दोन गटात राडा पाहायला मिळाला होता. महापौर निवडीवरुन अहमदनगरमधील शिवसेना नगरसेवकांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वादावादी झाली. यावेळी शिवसेना नगरसेविकेचे पती निलेश भाकरे यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे .नगर महापालिकेत भाजपच्या हातून सत्ता गेलेली असून शिवसेनेचे महापौर तर राष्ट्रवादीच्या नेत्याची उपमहापौर पदी बिनविरोध निवड झालेली आहे .


शेअर करा