अखेर ‘ ते ‘ रहस्य उलगडले..नदीच्या पुलाखाली सापडले होते मृतदेहाचे नऊ तुकडे : धक्कादायक सत्य आले बाहेर

शेअर करा

काही दिवसांपूर्वी नदीच्या पुलाखाली दोन गोण्या स्थानिक गावकऱ्यांना आढळून होत्या. ह्या गोण्याजवळ भयानक दुर्गंधी पसरलेली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले, त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात ही घटना घडली होती .

अकोले तालुक्यातील वाकी शिवारातून वाहत असलेल्या कृष्णावंती नदीच्या पुलाच्या खाली दोन गोण्या आढळून आल्या होत्या . भयानक दुर्गंध येत असल्याने लोकांनी याची माहिती राजूर पोलीस ठाण्यात कळवली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पुलाखालील दोन गोण्यांमध्ये काहीतरी भरल्याचे त्यांना दिसले. त्यातून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्या गोण्या उघडून पाहिल्यानंतर शरीराचे तुकडे असल्याचे दिसले.

त्यानंतर ह्या युवकाची ओळख पटावी म्हणून या युवकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच ह्या युवकाचे नाव प्रदीप सुरेश भांगरे ( वय २५ . रा. खिरविरे ता. अकोले ) असल्याची माहिती समोर आली. मयत प्रदीप व त्याचे आजोबा कमलाकर हनुमंत डगळे ( वय ७० रा. खिरविरे ) यांच्यात कायम वाद होत असल्याचे देखील पोलिसांना समजले. पोलिसांनी तात्काळ आजोबास ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली आणि अखेर त्या मृतदेहाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यास पोलिसांना यश आले. सदर तरुणाचा खून हा त्याच्या आजोबानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे.

नातू दारू पिण्यासाठी नेहमीच पैसे मागून त्रास देत असल्याने आईच्या वडिलांनी म्हणजे आजोबानी त्याचा खून केला. आजोबानी ह्या खुनाची कबुली दिली असून प्रेताची विल्हेवाट देखील लावण्याचे उघड झाले आहे . प्रेताची विल्हेवाट लावण्यास कमलाकर याच्या मुलाने देखील कमलाकर यास मदत केली. २७ जून रोजी संध्याकाळी प्रदीप भांगरे हा कमलाकर डगळे याच्याकडे मोटारसायकलवरून आला होता . त्याने आजोबाला दारू पिण्यासाठी पैसे मागितले आणि त्यावरून त्याचा आजोबांसोबत वाद झाला त्यानंतर आजोबाने प्रदीप याची कोयत्याने हत्या केली.

कोयत्याने नातवाला संपवल्यानंतर कमलाकर याने त्याच्या मृतदेहाचे तब्बल ९ तुकडे केले आणि ते दोन गोण्यांमध्ये भरून जवळच्या एका शेततळ्यात टाकून दिले. त्यानंतर कमलाकर याने त्याच्या मुलास बोलवून घेतले. मुलगा आल्यानंतर दोघांनी पुन्हा शेततळ्यातील गोण्या काढल्या आणि नदीवरील पुलाखाली फेकून दिल्या . मयत प्रदीप हा कमलाकर याच्या मुलीचा मुलगा होता .


शेअर करा