बरवाईट झाल्याच्या शंकेने बायकोने यंत्रणा हादरवली मात्र नवरा ‘ भलत्याच ‘ अवस्थेत सापडला

कोरोनाची लाट ओसरत असल्याने विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्यांचे पुन्हा फावलेले पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात समोर आली असून चक्क आपल्या नवऱ्याचे काही बरे वाईट झाले तर नसावे यासाठी पत्नी त्यांचा शोध घेत होती मात्र याच दरम्यान हे महाशय महिला पोलीस शिपायासोबत मौजमस्ती करत होते. पतीदेव रात्री उशिरापर्यंत अधिकारी घरीच पोहोचले नसल्यानं पत्नीनं पोलीस ठाण्यात फोन केला यानंतर पोलीस अधिकाऱ्याचं लोकेशन शोधण्यात आलं. अधिकाऱ्याचं लोकेशन पाहून पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली तर हे आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले.

सदर सर्कल अधिकाऱ्यानं पोलीस अधिक्षकांकडे सुट्टी मागितली आणि ते अधिकारी पोलीस ठाण्यातून निघाले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्यानं पत्नीनं त्यांना फोन लावले. मात्र त्यांचे नंबर स्विच ऑफ होते. तिनं याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली. उन्नाव एसपींनी लगेचच सर्व्हिलान्स टीमला कामाला लावलं. संपूर्ण सर्कलमधील पोलीस दल सीओंचा शोध घेऊ लागलं. सर्व्हिलान्स टीमला सीओंचं लोकेशन कानपूरच्या मॉल रोडजवळच्या हॉटेलमध्ये असल्याचं समजताच पोलिसांनी लगेच तिथे धाव घेतली.

पोलीस हॉटेलपर्यंत पोहोचले असता सीओ एका महिला शिपायासोबत आढळून आले.मूळचे गोरखपूरचे असलेले सीओ उन्नाव जिल्ह्यातल्या ग्रामीण सर्कलमध्ये तैनात होते. त्यांच्याच सर्कलमधील पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या एका शिपाई महिलेशी त्यांची मैत्री होती. गेल्या मंगळवारी सीओ आणि महिला शिपाई सुट्टी घेऊन खासगी कारनं कानपूरमधील मॉल रोडवरील हॉटेलमध्ये पोहोचले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील दृश्यांनुसार संध्याकाळी ५ वाजता दोघे हॉटेलमध्ये पोहोचले.

सीओ रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यानं त्यांच्या पत्नीनं उन्नावच्या पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधला. पत्नीसोबत काहीतरी बरंवाईट झाल्याचा संशय त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर पोलिसांनी वेगवान हालचाली सुरू केल्या. सर्व्हिलान्स टीमसोबतच संपूर्ण सर्कलमधील पोलीस कर्मचारी कामाला लागले. त्यानंतर पोलिसांनी सीओंचं लोकेशन शोधून काढलं. स्थानिक पोलीस ठाण्यातील एक निरीक्षक आणि दोन शिपायांनी मध्यरात्री हॉटेल गाठलं. तिथे सीओ आणि महिला शिपाई पोलिसांना सापडले.