खळबळजनक..१५१ पैकी ९० जण डेल्टा प्लस व्हेरियंटने बाधित आढळले

शेअर करा

शुक्रवारी त्रिपुरा राज्यातून पश्चिम बंगालमध्ये ‘जिनोम सिक्वेन्सिंग’साठी पाठवण्यात आलेल्या १५१ नमुन्यांपैंकी तब्बल ९० हून अधिक नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व नमुन्यांमध्ये करोनाचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. ‘डेल्टा प्लस’ हा अतिशय वेगानं फैलावणाऱ्या व्हेरियंट असून याच्यामुळे देशात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्रिपुराचे वैद्यकीय तज्ज्ञांनी यासंबंधी माहिती दिली. त्रिपुरातील कोविड १९ चे एक नोडल अधिकारी डॉ. दीप देव वर्मा यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरातून जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पश्चिम बंगालमध्ये १५१ आरटी-पीसीआर नमुने पाठवण्यात आले होते. यातील ९० हून अधिक नमुन्यांत डेल्टा प्लस व्हेरियंटसहीत पॉझिटिव्ह आढळले आहेत तसेच हा चिंतेचा विषय असू शकतो असे देखील ते म्हणाले आहेत .

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही यापूर्वी बुधवारी ३५ राज्य-केंद्रशासित प्रदेशांतील १७४ जिल्ह्यांत SARS-CoV-2 करोना विषाणूचा ‘चिंताजनक प्रकार’ आढळल्याचं म्हटलं होतं. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यातील सर्वाधिक प्रकरण महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि गुजरात या राज्यांत आढळले आहेत.


शेअर करा