.. अखेर शिर्डीतील ‘ त्या ‘ खुनाची उकल करण्यात पोलिसांना यश, चारही आरोपी जेरबंद

शेअर करा

शिर्डीतील राजेंद्र धीवर यांच्या हत्येचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आले असून दहा-बारा वर्षांपासून सुरू असलेल्या जुन्या वादातून सुपारी देऊन ही हत्या झाली असून याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. कोणताच पुरावा सापडत नसल्याने या तपासाची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिलेले होते .

29 जून रोजी राजेंद्र धीवर व संजय पवार हे शिर्डीतील दोघे तरुण राहत्यावरून रोजंदारीच्या कामावरून घरी परतत असताना नगर-मनमाड मार्गावर हॉटेल निसर्गसमोर मोकळ्या जागेत बसले होते त्यावेळी त्यांच्याकडे काडेपेटी मागण्याचे कारण काढून धारदार शस्त्रांनी राजेंद्र धीवर यांची हत्या करून चारही आरोपी फरार झाले होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय सातव व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनील कटके यांनी तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

गुन्हा तात्कालिक कारणावरून घडलेला दिसत असल्याचे तसेच मागे पुरावा नसल्याने पोलिसांच्या समोर गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. तब्बल 40 ठिकाणांवरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा केले त्यात आरोपींच्या चेहऱ्याची व वाहनांच्या नंबरची स्पष्टता दिसत नसल्याने फुटेजचे तांत्रिक विश्लेषण देखील करण्यात आले . त्यावरून आरोपी नाशिकच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले याबाबत नाशिक आयुक्तालयातील गुन्हे शाखेला आरोपींचे फोटो व दुचाकीचे वर्णन कळवण्यात आले त्यावरून नाशिक येथील पोलिसांनी राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे व अविनाश प्रल्हाद सावंत ( पाथर्डी जिल्हा नाशिक ) या युवकांना ताब्यात घेऊन नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले.

आरोपींना शिर्डी पोलीस ठाण्यात आणून अधिक तपास केला असता त्यांनी शिर्डीतील कालिका नगर भागातील अमोल सालोमन लोंढे याच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याचे सांगितले. पोलिसांनी अमोलकडे चौकशी केली असता त्याचा मृत राजेंद्र धीवर यांच्याशी दहा-बारा वर्षांपासून वाद असल्याने, त्याने शिर्डीतील अरविंद महादेव सोनवणे ( श्रीराम नगर ) याच्या ओळखीने नाशिकच्या राजू उबाळे याला चार लाखांची सुपारी देऊन राजेंद्र धीवरची हत्या केल्याचे सांगितले या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.


शेअर करा