मोठी बातमी : पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला, भेट झाली तर ..

शेअर करा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्या. त्यांनतर त्या आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यांच्यासोबत जेपी नड्डाही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीत वर्तवली जात असली मात्र मोदी यांच्याकडून पंकजा यांना वेळ मिळण्याची शक्यताही कमी असल्याचं बोललं जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची बैठक बोलावली होती. त्यामुळे पंकजा मुंडे या दिल्लीत दाखल झाल्या होत्या. मात्र पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्याने चर्चांना उधाण आलं होतं. दिल्लीत नड्डा यांच्यासोबतची बैठक पार पडल्यानंतर पंकजा मुंडे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या आहेत. मोदी यांनी वेळ दिला नाही तर समर्थकात वेगळा संदेश जाऊ शकतो त्यामुळे पुढे काय होणार याची समर्थकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे .

जर पंकजा मुंढे आणि मोदी यांची भेट झाली तर दिल्ली भेटीत पंकजा मुंडे या पंतप्रधान मोदी यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून त्यांच्याकडे मंत्रिपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा यांच्या 49 समर्थकांनी विविध पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंकजा यांनी समर्थकांची मुंबईत बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी ही बैठक होणार असल्याचं भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले. त्यामुळे पंकजा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

राजीनामा सत्र थांबेना..

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यानंतर बीडमध्ये राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली होती. कालपासून भाजपमधील अनेक मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांनी मोठा निर्णय घेतला असून येत्या मंगळवारी मुंबईत या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे .

वरळी येथील कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पंकजा मुंडे आपल्या समर्थकांची समजूत काढणार की काही वेगळाच निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील भाजपच्या 49 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत तर दुसरीकडे पंकजा मुंडे रविवारी सकाळीच दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना स्थान मिळाले. मात्र खासदार प्रितम मुंडे यांना कोणतेही मंत्रिपद दिले गेले नाही. केंद्राच्या या निर्णयामुळे बीडमधील भाजप पदाधिकारी नाराज असून जिल्ह्यातील सर्वच भाजप तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला असून यात परळीसह एकूण 11 तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. मुंढे परिवारावर हा अन्याय झाल्याने हे पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे.

मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यामान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. सुनीता दौंड यांच्यासोबतच त्यांचे पती गोकुळ दौंड यांनी सुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. स्व. गोपीनाथ मुंढे यांच्यानंतर मुंढे भगिनींच्या हातात जिल्ह्यातील मतदारांची मोठी ताकत एकवटलेली आहे त्यामुळे केंद्राने प्रीतम मुंडे यांना डावलायला नको होत असे देखील मत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न मिळाल्यानं मुंडे समर्थक चांगलेच नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. बीडमध्ये अनेक मुंडे समर्थकांनी भाजपच्या पदाचा राजीनामा देत आपली उघड नाराजी व्यक्त केलीय. कुठलीही नाराजी नसल्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता या राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केलीय.


शेअर करा