लग्नातच नवरा नवरी झाले ‘ भलतेच ‘ रोमँटिक : व्हिडीओ व्हायरल

शेअर करा

लग्नात सर्वांचंच लक्ष नवरदेव अन् नवरीबाईकडे असतं. नवरी आणि नवरीदेव काय करत आहेत किंवा बोलत आहेत याकडे सर्वांचे कान आणि डोळे असतात. सोशल मीडियावर लग्नातील अनेक असे व्हिडिओ व्हायरल होतात जे पाहून नेटकरीही हैराण होतात. असाच एका लग्नातील नवरदेव आणि नवरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे . लग्नातच त्यांचा हा रोमँटिक अंदाज अनेक जणांच्या पसंतीस उतरलेला आहे .

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नात जेवणाच्या वेळी नवरदेव अत्यंत रोमँटिक मूडमध्ये आहे. तो प्रेमानं नवरीला गुलाबजाम खाऊ घालत आहे. नवरीबाई अगदी छोटासा घास घेते आणि नंतर हाच गुलाबजाम नवरदेवाला खाऊ घालते. नवरीचं हे कृत्य पाहून नवरदेव लाजतो आणि कॅमेऱ्यासमोरच हसू लागतो.

नवरदेव अन् नवरीचा हा मजेशीर आणि रोमँटिक व्हिडिओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच हसू आलं असेल. हा व्हिडिओ निधी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 60 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. सोबतच अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. अनेकांचं असं म्हणणं आहे, की या नवरीपेक्षाही नवरदेवच अधिक क्यूट आहे.


शेअर करा