त्याच्या प्रेमात झाली होती आंधळी..लग्नाआधीच एक अपत्य झाल्यावर मात्र ‘ तो ‘ म्हणाला ? : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

चित्र : प्रतीकात्मक

दोघे सोबत मेडिकल कॉलेजला शिकत होते. कॉलेजमध्ये एकमेकांशी ओळख झाली. पुढे मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे एकमेकांच्या संमतीने त्यांनी शारीरिक संबंध ठेवले आणि त्यातून एक अपत्य देखील झाले मात्र त्यानंतर तो तिला टाळू लागला.अखेर त्या तरुणीने पोलिसात तक्रार केली आणि त्याला गजाआड केले. सांगली इथे ही घटना घडली असून आरोपी सध्या गजाआड आहे .

सांगलीतील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने एका सोबत शिकत असलेल्या मुलीला लग्नाच्या भूलथापा दिल्या. त्यातून दोघांमध्ये अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले . पुढे त्यातून तिला एक अपत्य देखील झालं मात्र त्यानंतर तरुणानं लग्नास नकार दिला. पीडित तरुणीने त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. पृथ्वीराज पाटील (रा. निंबवडे, ता. आटपाडी ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून विश्रामबाग पोलिसांनी त्याला रविवारी रात्री उशिरा अटक केली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील पृथ्वीराज पाटील हा सांगलीतील एका प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असताना त्याची याच कॉलेजमधील एका मुलीशी मैत्री झाली. पीडित मुलगी ही देखील त्याच कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत आहे .कालांतराने या दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पृथ्वीराज पाटील याने विश्रामबाग परिसरात तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

अनेकदा दोघांमध्ये शारीरिक संबंध आल्यावर तरुणीला अपत्यही झाले तोपर्यंत सर्व ठीक होते मात्र लग्नाची वेळ येताच त्याने तोंड फिरवले. तरुणीने पृथ्वीराज याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला मात्र त्याने हाथ वर केले.पुढे त्याने त्या तरुणीशी संपर्क देखील तोडला. फसवणूक आणि लैंगिक अत्याचार झाल्याने पीडित तरुणीने रविवारी रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार, पृथ्वीराज पाटील याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील हे करत आहेत.


शेअर करा