‘ तुला टॉप लेव्हलला पोचवतो फक्त तू .. ‘, नागरिकांनी काढली धिंड : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

कॉलेजमधील मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवत बारावीत शिक्षक असलेल्या विद्यार्थिंनीकडे कॉलेजमधील एका कर्मचा-याने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयात घडला आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर विद्यार्थिनीच्या घरच्यांनी संबंधित कर्मचा-याला चोप देत बुधवारी (ता. १४) त्याची महाविद्यालय ते पोलिस ठाण्यापर्यंत काळे फासत धिंड काढली होती.

अभिजित पवार असे या कर्मचा-याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयातील कर्मचारी आहे. पीडित मुलगी त्याच कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. मार्क वाढवून देतो, असे म्हणते त्याने या विद्यार्थिंनीकडे शरीर सुखाची मागणी केली होती. गेले तीन दिवस तो ही मागणी करीत होता.

विद्यार्थिनीने पवार याच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग देखील केले आहे. त्याच्या जाचाला वैतागून विद्यार्थिनीने हे रेकॉर्डिंग घरी ऐकवले आणि त्यानंतर संतप्त पालकांनी बुधवारी महाविद्यालयात गाठले आणि पवार याच्या तोंडाला काळे फासत त्याची पोलिस ठाण्यापर्यंत त्याची धिंड काढली.

अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवतो, स्कॉलरशीप मिळवून देतो, मार्क वाढवून टॉप लेव्हलला पोचवतो, असे आमिष अभिजित पवार याने या विद्यार्थिंनीना दाखवले होते. तो गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थिंनीला तो अशी आमिषे दाखवत होता. विद्यार्थिनीने घरच्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी गामिनी कावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महाविद्यालय गाठले आणि पवार याला जाब विचारला. मात्र त्याने सर्व आरोप फेटाळले. पण विद्यार्थिनीने रेकॉडिंग दाखविल्यावर मात्र त्याची बोलती बंद झाली.

पालकांनी संबंधित कर्मचा-यास चोप देत पोलिस ठाण्यात आणले होते . संबंधित विद्यार्थिनी सोडून इतर कोणासोबत असा प्रकार झाला असल्यास त्यांनी तक्रार करण्यास पुढे यावे. असा प्रकार पुन्हा होवू नये, याबाबतच्या सूचना संबंधित विद्यालयाच्या प्रशासनाला देण्यात आल्या आहेत असे विजय तिकोने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे .


शेअर करा