नाशिकमध्ये बाभळीच्या झाडावर ‘ असाही ‘ प्रकार आढळल्याने परिसरात वेगळीच चर्चा

  • by

 1 total views

नाशिकमध्ये बाबा, बुवांच्या खोट्या अफवाना अनेक जण बळी पडताना दिसत आहेत. पंचवटीमधील अमरधाम परिसरात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे स्मशानालगत असलेल्या बाभळीच्या झाडाला खिळे ठोकत त्यावर लिंबू आणि काळ्या बाहुल्या बांधून पूजाअर्चा केल्याचं समोर आलंय. एका बाभळीच्या झाडावर केलेल्या या जादूटोण्याच्या प्रकाराचा अंधश्रद्धा निर्मूल समितीने पर्दाफाश केला आहे.

सदर घटना पंचवटीमधील अमरधाम परिसरात घडली आहे. येथे स्मशानालगत असलेल्या एका काटेरी बाभळीला काही अज्ञातांनी लोखंडी खिळे ठोकले आहेत. तसेच या खिळ्यांच्या मदतीने बाभळीवर लिंबू आणि काळ्या बाहुल्या लटकवण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे येथे काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार फक्त लोकांना लुबाडण्यासाठी करण्यात आल्याचं सांगत याचा भंडाफोड केला आहे.

अशा घटनांमध्ये भोंदूबाबांनी सामान्य लोकांना एखाद्या गोष्टीची भुरळ घातलेली असते. तुम्हाला भरपूर पैसा मिळेल. तुमचे चांगले होईल अशा प्रकारे आमिष दाखवले जाते. त्यानंतर हे मांत्रिक लोकांकडून पैशांची मागणी करतात. पंचवटी परिसरातील ही घटना समोर आल्यानंतर घटनास्थळावरून जादूटोण्याचं सर्व साहित्य जप्त करण्यात आलंय. तसेच जादूटोना करणं कायद्याने गुन्हा आहे. मात्र काही जण भोंदुगिरी करत आपली पोळी भाजत असल्याचं समोर येत आहे. अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे. तसेच तुमच्या भागातही असा जादूटोण्याचा प्रकार समोर आला तर घाबरून न जाता, पोलिसांना माहिती द्यावी. तसेच भोंदुगिरी करणाऱ्या लोकांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलं आहे.

पुण्यात शिरूरजवळ देखील झाला होता असाच प्रकार

महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातील पाबळ येथे एक धक्कादायक घटना समोर आली होती . अघोरी विद्येचा हा प्रकार भासवत परिसरातील नागरिक देखील ही घटना उघड झाल्यानंतर चांगलेच धास्तावले होते याशिवाय गावाच्या आजूबाजूच्या गावांमध्येही हा प्रकार चर्चेला कारण ठरला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी नंदिनी जाधव यांनी या प्रकरणाची माहिती दिली होती. .

पाबळ येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा एका काळ्या पिशवीवर कोहळ्याचा भोपळा ठेवण्यात आला होता . कोहळ्याचा खालचा भाग काळ्या पिशवीत होता अन कोहळ्याला टाचणी टोचून एका मुलीचा फोटो लावण्यात आलेला होता . स्मशानभूमीत कोहळ्यावर मुलीचा फोटो लावून अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार घडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . पाबळमधील स्मशानभूमीमध्ये दशक्रिया विधी सुरू असताना नागरिकांचे याकडे लक्ष गेले आणि ही घटना समोर आली.

काही दिवसांपूर्वी बुलडाण्याच्या एका स्मशानभूमीतही अघोरी प्रकार उघड झाला होता. मलकापूर शहरातील माता महाकाली परिसरातील रहिवासी आशिष गोठी या युवकाच्या वडिलांचे आणि भावाचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांची आत्मशांती झाली नाही म्हणून त्याच्या घरात शांतता भंग पावली, असा त्याचा समज असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून आशिष गोठी याने शुक्रवारी (9 जुलै) रात्री 9 वाजेच्या सुमारास तीन मांत्रिक स्मशानभूमीत पाचारण केले. मंत्रोच्चार करून प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार सुरु असल्याने नागरिकांमध्ये ह्या घटनेची जोरदार चर्चा सुरु झाली होती.