धक्कादायक : घरातील मोलकरणीवर टाकला पूर्ण विश्वास मात्र तिने ..

शेअर करा

एका डॉक्टर कुटुंबीयाने घरातील मोलकरणीवर खूप विश्वास टाकला मात्र तिने योग्य वेळ येताच त्यांना दगा दिला, बातमी नागपूर येथील असून नागपुरातील एका डॉक्टर कुटुंबियांचा त्यांच्या घरातील मोलकरणीवर खूप विश्वास होता.डॉक्टर कुटुंबाने विश्वासाने त्यांचं घर तिच्या स्वाधीन केलं होतं. संबंधित कुटुंब कामानिमित्त घर सोडून बाहेर गेलं होतं. पण मोलकरणीने वेळ साधत घरातील दागिन्यांवर डल्ला मारला.

अनेक वर्षांपासून घरी मोलकरीण असलेल्या महिलेवर डॉक्टर कुटुंबियांनी विश्वास ठेवला होता. या कुटुंबाने तिला घरातील सदस्यांप्रमाणे वागणूक दिली. मात्र घरातील पैसे बघून तिची नियत बिघडली. तिने हळूहळू पैसे चोरी करणे सुरू केले. कोणाच्याही लक्षात येत नाही हे बघून तिची लालच वाढली. त्यानंतर तिने चक्क कपाटातील दागिने चोरी केले. ही बाब लक्षात येताच डॉ. संजय कुमार बारीक यांनी पोलिसात तक्रार दिली आणि तिला जेरबंद करण्यात आले.

चोराचा सुगावा लागणे कठीण होते. मात्र आरोपी मोलकरीण सीमा कटरे ही आनंदात फिरत होती. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी तिची चौकशी केली. यावेळी तिने आपला गुन्हा कबूल केला. तिने चोरी केलेले दागिने एका ज्वेलर्स दुकानाला 2 लाख 75 हजारात विकले होते. हे दागिने विकण्यासाठी तिने ज्वेलर्सला आपला पती आजारी असून तिचं ऑपरेशन करायचं असल्याचं कारण दिलं. मात्र पोलिसांनी तिला अटक करून सगळा मुद्देमाल जप्त केला.


शेअर करा