बीड हादरले ..प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या

शेअर करा

काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथून बीड जिल्ह्यातील उत्रेश्वर पिंपरी येथे आलेल्या प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. प्रथम प्रेयसीने आणि त्यानंतर काही तासांतच प्रियकराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप समजलेलं नसून आकाश शिवाजी धेंडे आणि सावित्री अशी मृतांची नावे आहेत.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील आकाश शिवाजी धेंडे हा त्याच्या आई वडिलांसह कोल्हापूर येथे रामनगर भागात मजुरीचे काम करत असे. काम करत असतानाच त्याचे घराशेजारी राहत असलेल्या दोन मुलींची आई असलेल्या सावित्री या विधवा महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. तीन महिन्यांपूर्वी आकाश आणि सावित्री उत्रेश्वर पिंपरी येथे आले.

मंगळवारी आकाश घराबाहेर गेल्यानंतर सावित्रीने स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश घरी परतल्यानंतर त्याला हा प्रकार दिसून आला. शेजारील वयोवृद्ध महिलेस बोलावून घेतले असता त्यांनी सावित्री मृत झाल्याचे आकाशला सांगितले. सदर महिला तेथून निघून गेल्यानंतर मंगळवारी रात्रीच आकाशने ही घरातील लोखंडी आडूस स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली.बुधवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. केज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे आणि बिट अंमलदार अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.


शेअर करा