मोदींचे अपयश उघडे पाडणाऱ्या ‘ ह्या ‘ माध्यम समूहांवर प्राप्तीकर विभागाचे छापे

  • by

 24 total views

मोदींचे कोरोना काळातील अपयश उघडे पाडणाऱ्या माध्यम समूह ‘दैनिक भास्कर’ आणि ‘भारत समाचार’ वर प्राप्तीकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. केंद्राला अडचण ठरत असलेल्या व्यक्ती व संस्था यांना केंद्र कायम जनसामान्यात विश्वास असलेल्या सरकारी यंत्रणेचा तसेच प्रभावी व्यक्तींचा देखील वापर करून लक्ष करत असल्याचे याआधी देखील कित्येकदा दिसून आलेले आहे . केंद्राच्या या कारवाईवरून विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकार मीडियाचा किती गळा आवळणार? असा सवाल काँग्रेसने केला आहे. यंत्रणा आपलं काम करत असतात आणि यात सरकार कुठलाही हस्तक्षेप करत नाही, अशी मखलाशी माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे .

कर चोरी असल्याचा दावा करत प्राप्तीकर विभागाने प्रमुख माध्यम समूह ‘दैनिक भास्कर’ आणि हिंदी वृतवाहिनी ‘भारत समाचार’ च्या विविध शहरांमधील कार्यालयावर गुरुवारी छापे टाकले. दैनिक भास्करच्या भोपाळ, जयपूर, अहमदाबाद आणि इतर काही ठिकाणांवर छापे टाकण्यात आले मात्र गोदी मीडियात मात्र याविषयी निव्वळ सन्नाटा असून याविषयी चर्चा देखील केली न जाणे हा चिंतेचा विषय आहे .

‘दैनिक भास्कर’ आणि हिंदी वृतवाहिनी ‘भारत समाचार’ च्या कार्यालयांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांवरून काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंबंधी ट्वीट केलं आहे. माध्यमांचा आणखी किती गळा आवळणार? माध्यमं आणखी किती दबाव सहन करणार? कधीपर्यंत सत्यावर सत्तेच्या बेड्या राहतील? ‘दैनिक भास्कर’ आणि ‘भारत समाचार’वरील ‘रेड राज’ विरोधात एकाही वृत्तवाहिनीवर चर्चा केली जात नाहीए. ही अतिशय खेदाची बाब आहे. आता नाही तर मग कधी? असा सवाल सुरजेवाला यांनी केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ‘दैनिक भास्कर’ आणि ‘भारत समाचार’वरील प्राप्तीकर विभागाच्या छापेमारीला विरोध केला आहे. माध्यमांना घाबरवण्यासाठी ही कारवाई होत आहे. अशा प्रकारची कारवाई तातडीने रोखली पाहिजे. माध्यमांना स्वतंत्रपणे काम करून दिले पाहिजे, असं केजरीवाल म्हणाले.

‘पत्रकारितेवर मोदी शहांचा प्रहार!! मोदी शहांचे एकमेव शस्त्र आयटी, ईडी, सीबीआय आहे. अग्रवाल बंधू घाबरणार नाही, यावर मला विश्वास आहे. दैनिक भास्कर विविध ठिकाणांवर प्राप्तीकर विभागाची कारवाई सुरू आहे’, असं ट्वीट काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांनी केलं आहे तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ‘ काग़ज़ पर स्याही से सच लिखना, एक कमज़ोर सरकार को डराने के लिए काफ़ी है। ‘ असे ट्विट करत या कारवाईचा निषेध केला आहे .