नगर जिल्ह्यात लसीकरणाची काय आहे परिस्थिती ?

शेअर करा

नगर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची चांगलीच बोंबाबोंब झालेली असून लस मिळणे दुरापास्त झालेले आहे. लस मिळेल काय अशी मोबाईलवरून विचारणा करणारे अनेक फोन नगरसेवक, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना येत आहेत. नगर शहरात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना लस उपलब्ध होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे लवकरच लस उपलब्ध झाली नाही तर येत्या काळात लसीचा काळाबाजार होण्याची देखील मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

नगर शहरात गुरुवारी सात दिवसांनंतर लस मिळाली मात्र रांगेत उभे राहिलेले तसेच पहिल्यांदा लस घेणारे यांना ती मिळालीच नाही. खाजगी दवाखान्यात मात्र 740 रुपये भरल्यानंतर कोरोना लस मिळत आहे मात्र गोरगरीब जनतेसाठी लस उपलब्ध करून देण्याच्या निव्वळ घोषणा झाल्या असून प्रत्यक्षात मात्र लस मिळेल अवघड झालेले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांची लसीकरण केंद्रावर पायपीट सुरू असून कित्येकदा हेलपाटे मारून देखील मोफत लस उपलब्ध होत नाही.

नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना लसीचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. रोज जिल्ह्यासाठी केवळ तीन ते चार हजार दिले जात आहेत. लसीच्या डोसची ही संख्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या मानाने अत्यंत तोकडी संपूर्ण जिल्ह्यात लसीचा पुरवठा करायचा झाल्यास आत्ताच्या परिस्थितीत एका केंद्रावर दहा ते वीस तेवढ्याच लोकांना न देता येईल अशी परिस्थिती आहे. नगर शहरात देखील एका दिवशी किमान पाच हजार लोकांना देता येईल एवढा लसीचा पुरवठा आवश्यक आहे मात्र मागणीच्या तुलनेत दहा टक्के देखील उपलब्ध होत नसल्याने मोफत लसीकरणाचे दावे हवेतच विरले आणि नागरिकांच्या नशिबी हेलपाटे मारणे आले असे चित्र निर्माण झाले आहे.

नगर शहरात महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर लस उपलब्ध होत नाही मात्र खासगी कंपन्यांना थेट कंपनीकडूनच विकली जाते त्यामुळे पैसे देऊन ही लस नागरिकांना विकत घ्यावी लागते तर सरकारी दवाखान्यांमध्ये मात्र लसीकरणाचा तुटवडा आहे यामुळे यामुळे लस बनवणाऱ्या कंपन्यांनी सरकारला लस देण्यापेक्षा हा खाजगी दवाखान्यांना जास्त प्रमाणात दिली का ? हा देखील प्रश्न उपस्थित होतो.

कित्येकदा हेलपाटे मारून देखील मिळत नसल्याने काही सधन लोकांनी खाजगी दवाखान्यात पैसे देऊन लस टोचून घेतली आहे मात्र आधीच वाढती महागाई, बुडालेले बेरोजगार यामुळे हतबल झालेले गोरगरीब नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. दोन आठवड्यापासून महापालिकेच्या केंद्रावर उपलब्ध झाली नाही मात्र हीच लस खाजगी दवाखान्यात पैसे दिल्यानंतर उपलब्ध होते यावरून मोफत लसीकरणाबाबत सरकार कितपत गंभीर आहे हे लक्षात येते.

नगर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांच्या म्हणण्यानुसार, नगर शहराला रोज किमान पाच हजार जणांना देता येईल एवढी लस उपलब्ध झाली तरच दोन महिन्यात संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण होऊ शकेल. त्यात पहिला व दुसरा डोस देखील पूर्ण होणे आवश्यक राहणार आहे शासनाकडून आवश्यक तेवढी लस उपलब्ध होत नसल्याने सध्या टंचाई निर्माण झालेली आहे.


शेअर करा