फॅक्ट चेक : ‘ तसले ‘ व्हिडीओ बघताय तर ३००० रुपये दंड भरा

शेअर करा

कोरोना काळात सोशल मीडिया अन डिजीटल ट्रान्झेक्शनच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे तर दुसरीकडे ऑनलाईन फ्रॉड अन सायबर क्राईमच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत अनेक सायबर क्रिमिनल्सनी युजर्सला गंडा घातला असून मोठ्या प्रमाणात पैशांची फसणूक केली आहे. आता पुन्हा एकदा असाच एक वेगळ्या पद्धतीने ऑनलाईन फ्रॉडचा प्रकार समोर आला आहे.

पॉर्न पाहण्याबाबतची पोलिसांच्या नावाने एक नोटीस सध्या सोशल मीडियात फिरत आहे. भारतात अश्लील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पहिले जातात हेच लक्षात घेऊन ही नोटीस व्हायरल केली गेल्याचा अंदाज आहे. युजर्सकडून इंटरनेटवर पॉर्न सर्च केलं जात असताना त्यावेळी ब्राउजरमध्ये एक पॉपअप येतो. हा पॉपअप पोलिसांची नोटिस असल्याच्या नावाने येतो. ‘तुम्ही पॉर्न पाहत आहात, हा गुन्हा आहे. 3000 रुपये दंड भरावा लागेल, दंड न भरल्यास तुमचा कंप्यूटर ब्लॉक केला जाईल’ असं पॉपअप नोटिसमध्ये लिहून आल्याने भल्याभल्यांचे धाबे दणाणले.

अनेक जणांनी हे खरे समजून त्यावर क्लिक करून पैसे देखील निमूटपणे भरले. अनेकांची फसणूक केल्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने कारवाई करत या फ्रॉड टोळीला अटक केली आहे. दोन जणांना चेन्नईतून अटक करण्यात आली आहेत. चौकशीदरम्यान एका लोकल मास्टर माईंडला ताब्यात घेण्यात आलं आहे तो कंबोडियामधून असे फ्रॉड करत होता .

आतापर्यन्त या फ्रॉडमध्ये आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांची फसणूक झाली आहे मात्र फसवणुकीनंतरही याबाबत आतापर्यंत एकही तक्रार पोलिसांत दाखल झालेली नाही. पोलिसांना सोशल मीडियाद्वारे या बनावट, फेक नोटिशीची माहिती मिळाली. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. सदर टोळीने आतापर्यंत लाखो रुपये वसूल केले असून पोलिसांना 30 ते 40 लाख ट्रान्झेक्शनची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.


शेअर करा