नगरसोबत सुपा इथे आरोपी घेऊन जायचा आणि त्यानंतर ..: नगरमधील धक्कादायक घटना

शेअर करा

महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणीला तिच्या मित्राने गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करत त्याचे चित्रीकरण केले त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पुन्हा तरुणीवर अत्याचार केले, अशी घटना नगर शहरात समोर आली आहे. पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीसह त्याच्या ३ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना 2017 ते 18 जुलै २०२१ पर्यंत घडत होती. जाकिर शाहीन शेख, शहाबाज उर्फ मुन्ना शहाबाज शेख, निषाद शाहीन शेख ( तिघेही राहणार सोनई तालुका नेवासा ) व ओमकार मिलिंद चवंडके राहणार ( नगर ) अशी आरोपींची नावे आहेत. यातील निषाद शेख वगळता इतर तिघांना पोलिसांनी अटक केली असून 29 जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे

नगर शहरातील पीडित तरुणी व आरोपी जाकीर शेख हे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. शिक्षण घेत असताना या दोघांची मैत्री झाली व या मैत्रीचा गैरफायदा घेत शेख याने 2017 मध्ये तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी आरोपीने एका साथीदाराच्या मदतीने अश्लिल व्हिडिओ चित्रीकरण केले तसेच त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीवर नगर शहरातील व सुपा येथील लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केला.

सातत्याने झालेल्या या प्रकारामुळे पीडिता गर्भवती राहिली तेव्हा आरोपीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने तिचा गर्भपातही घडून आणला या त्रासाला कंटाळून पीडित तरुणी व तिच्या कुटुंबीयांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महाजन हे पुढील तपास करत आहेत.


शेअर करा