कोरोनाग्रस्त पतीच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने पत्नीचा ‘ असा ‘ निर्णय की …

शेअर करा

सर्व कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडले आणि त्यात पतीची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे हतबल होऊन वसईत पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईच्या मर्सेस गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. स्मिता डिसिल्वा (वय 35) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव असून त्यांच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे .

स्मिताचे पती विवेक डिसिल्वा (वय 39) काही दिवसांपूर्वी परराज्यात जाऊन आले होते. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. याच वेळी सासू सासऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. सर्वांना वसईच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र उपचारा दरम्यान पतीची प्रकृती चिंताजनक होत चालली होती. त्यामुळे आता कसे होणार, या धास्तीने पत्नीने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

स्मिता यांनी एक सुसाईड नोट लिहून आपल्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असे लिहून ठेवले असल्याचेही समोर आले आहे. वसई पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे. कोरोनामुळे नागरिकांचे मानसिक स्वस्थ बिघडत असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत . बंद पडलेले व्यवसाय अन बुडलेले रोजगार यामुळे देखील अनेक आत्महत्या झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहे .


शेअर करा