महाराष्ट्र हादरला..सरकारी नोकरीसाठी प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले, असा होता मास्टरप्लॅन ?

पत्नीने प्रियकर आणि आईच्या मदतीने गळा आवळून आपल्याच पतीची हत्या केल्याचा प्रकार चंद्रपूरच्या बल्लारपूर इथे उघडकीस आला आहे. मृत व्यक्तीचे नाव मारुती काकडे असे असून ते कोळसा खाणीत कामावर होते. पतीचा गळा खून केल्यानंतर महिलेने मृतदेह पोत्यात भरून बल्लारपूर येथील नदीकिनारी फेकला होता.पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सचा वापर करत अत्यंत क्लिष्ट प्रकरणाचा गुंता सोडवला. मद्यपी पतीला संपवून सरकारी नोकरी मिळवत प्रियकरासोबत विवाह करण्याचा आरोपी पत्नीचा बेत होता विशेष म्हणजे यात तिला तिच्या आईची देखील साथ मिळाली हे विशेष ..

बल्लारपूर शहरातील वर्धा नदीकिनारी काही दिवसांपूर्वी पोत्यात भरून फेकून दिलेला एक मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला आणि मयताची ओळख पटली . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत मारूती काकडे हे सरकारी कोळसा कंपनीत खाण कामगार होते. त्यांना दारु पिण्याची सवय असल्याने त्यांचे त्यांच्या पत्नीशी सतत वाद होत होते .

पतीशी पटत नसल्याने मारुती काकडे यांच्या पत्नीचे स्वतःच्या बहिणीचा दीर संजय टिकले याच्याशी प्रेमसंबंध जुळले. मारूती काकडे यांची पत्नी आणि संजय टिकले या दोघांनी मारूती काकडे यांचा काटा काढण्यासाठी कट रचला. पतीला संपवल्यानंतर त्याची सरकारी नोकरी आपल्याला मिळेल व प्रियकरासोबत विवाह करून आपले आयुष्य सुखी होईल, असा आरोपी महिलेचा प्लॅन होता. आईची देखील साथ असल्याने काकडे यांच्या पत्नीला कोणाची भीती वाटली नाही .

आरोपी महिला आणि आरोपी संजय टिकले यांनी मारुती काकडे यांना संपवण्याचा प्लॅन केला आणि एक साथीदार विकास नागरले याचा वापर करत ‘ भाड्याने घर मिळेल का ? ‘ याची विचारपूस करण्यासाठी विकासला मारुतीकडे पाठवले . गप्पा झाल्यावर मारुती यांना दारू पाजण्याचे आमिष दाखवले आणि त्यानंतर बाहेर पडल्यानंतर नकोडा येथेच मारुती यांचा गळा आवळून खून करण्यात आला. मारुती जिवंत राहू नयेत यासाठी त्यांना नदीपात्रात बुडवण्यात आले व नंतर मृतदेह एका पोत्यात भरून पुन्हा बल्लारपूर शहरालगत असलेल्या वर्धा नदी किनारी मारुती यांचा मृतदेह फेकण्यात आला.

बल्लारपूर शहरापासून दूर 50 किमी अंतरावर असलेल्या नकोडा येथे हा प्लॅन आरोपींची तडीस नेला. पोलिसांनी मयताचे मोबाईल कॉल डिटेल्स व आरोपींचे डिटेल्स यांची पडताळणी केली. तसेच या खुनाचा छडा लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मारुती यांची पत्नी, पत्नीची आई, पत्नीचा प्रियकर संजय टिकले तसेच साथीदार विकास नागरले या सर्वांचा या खुनामध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. या सर्वांना अटक करण्यात आले असून त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.