नगर ब्रेकिंग..मुलीनं पंधराव्या वर्षीच दिला बाळाला जन्म आणि त्यानंतर ..

शेअर करा

अल्पवयीन मुलीचं किंवा मुलाचं लग्न लावून देणं हा कायद्यानं गुन्हा आहे मात्र तरीही देशातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुला-मुलींचे लग्न लावून दिले जातात. अल्पवयीन असताना लग्न झाल्याने मुलींना कमी वयातचं मातृत्व स्विकारावं लागतं आणि भविष्यात विविध अडचणींना सामोरं जावं लागतं. आई वडिलांनी चौदाव्या वर्षी मुलीचं लग्न लावून दिल्यानं संबंधित मुलगी 15 व्या वर्षीच आई झाल्याची निंदनीय घटना नगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे .

बाळाला जन्म देणारी मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती समोर येताच मुलीचे आई -वडील आणि सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचं किमान लग्नाच वय 18 वर्षे आणि मुलाचं 21 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे, असं असूनही ग्रामीण भागात सर्रासपणे या कायद्याचं उल्लंघन केलं जातं. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर तर असे प्रकार सर्रास झाले आहेत. अहमदनगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

15 वर्षीय पीडित मुलगी नगर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. मुलीच्या आई वडिलांनी मे 2020 मध्ये तिचं लग्न लावून दिलं होतं. तेव्हा ती केवळ चौदा वर्षांची होती. लग्नानंतर काही महिन्यातचं तिला गर्भधारणा झाली होती. काही दिवसांपूर्वी संबंधित मुलीला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आलं होतं. दरम्यान संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचं तेथील डॉक्टरांच्या निदर्शनास येताच डॉक्टरांनी ही बाब पोलिसांच्या कानावर घातली.

चाइल्ड लाइन या संस्थेकडून देखील ह्या घटनेची पुष्टी करण्यात आली असून यानंतर अहमदनगर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांनी संबंधित आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. संबंधित मुलीनं पुण्यातील ससून रुग्णालयात 15 व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे आई -वडील आणि सासू सासऱ्यांविरोधात बाल विवाह लावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.


शेअर करा