… आणि म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते कमी दरात चिकन विकणार , ‘ हा ‘ असेल दर

शेअर करा

फुकट पेट्रोलपासून ते अनेक गोष्टी फुकट देण्याच्या आयडिया विविध राजकीय पक्षांना सुचत असतात. मतदार देखील स्वतःचा फायदा करून घेत असल्याने कोणी त्यांच्या ‘ फुकटम ‘ ऑफरला नको देखील म्हणत नाही . अशीच एक आयडिया सध्या शिवसेनेला सुचली असून वसई विरार महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ही अद्भुत आयडिया चर्चेत आली आहे . गटारीच्या निमित्ताने विरारमधील शिवसैनिकांनी खवय्यांना चक्क अल्प दरात चिकन देण्याचे आमिष दाखवण्यात आले आहे. मांसाहाराच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर चिकन प्रति किलो 180 रुपयांना मिळणार आहे .

विरार पूर्व भागातील साईनाथ नगर येथील शिवसैनिकांनी अल्प दरात एक किलो चिकन विक्रीची घोषणा केली आहे. सध्या विरारमध्ये सध्या चिकनचे दर प्रति किलो 230 ते 240 रुपयांवर पोहोचले आहेत.गटारीचे जवळ आल्यामुळे मांसाहाराच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी हेच चिकन प्रति किलो 180 रुपयांना देणार, असे फलक लावून जाहिरात केली आहे मात्र प्रत्येकाला फक्त १ किलोच चिकन देण्यात येणार असल्याने दाबून खाणाऱ्यांना मात्र वेगळी शक्कल लढवून आणखीन चिकन पदरात पाडून घ्यावे लागणार आहे .

तळीरामांसोबतच मांसाहारी खवय्यांचे डोळेही गटारी दिवसाकडे लागलेले असतात.रविवारी 8 ऑगस्टला विरार पूर्व साईनाथ नगर नाका येथे सकाळी 9 ते 11 या वेळेत हे चिकन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे. महिला आघाडीच्या सौ रुचिता चेतन रुके यांनी हे आयोजन केले आहे.


शेअर करा