महाराष्ट्र हादरला..तब्बल ‘ इतक्या ‘ वेळा शिक्षकाने पत्नीचा गर्भपात केला अन त्यानंतर ..

शेअर करा

मुलाच्या हव्यासापोटी शिक्षक पतीने चक्क 7 वेळा बळजबरीने गोळ्या चारून पत्नीचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना बीड इथे उघडकीस आली असून पेशाने शिक्षक असलेल्या या पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षक म्हणून मिरवणाऱ्या व्यक्तीने मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा तब्बल 7 वेळा गर्भपात केल्याचं समोर आले असून खुद्द पीडित विवाहितेने पोलिसांत तक्रार दिली आहे. बीडच्या चौसाळा गावांमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह बीडच्या चौसाळा येथील शिक्षक फेरोज शेख याच्याशी 2008 मध्ये झाला होता. या दरम्यान 2011 ला एक मुलगी झाली. तेव्हा हे पहिले तीन वर्ष सुखात संसार झाला. मात्र त्यानंतर आता मुलगाच हवा यासाठी पीडितेचा छळ सुरू झाला.एकीकडे पीडित महिलेचा छळ सुरु झाला तर दुसरीकडे त्याचे एका दुसऱ्या शिक्षक महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचं देखील समोर आलं.

पीडित महिला यावरून विरोध करू लागल्याने तिचा आणखी छळ सुरू झाला. 2012 ते 2019 पर्यंत पती फेरोज याने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 7 वेळा पीडितेचा मुलाच्या हव्यासापोटी गर्भपात केला. गर्भपाताला विरोध दर्शविल्याने पती फिरोजकडून मारहाण केली जात असे. गर्भखाली व्हावा, यासाठी बळजबरीने गोळ्या देखील तो खाऊ घालत असे .

पती आणि सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांचा जामीन देखील झाला आहे. मात्र ज्या महिलेमुळे माझा सोन्याचा संसार उद्ध्वस्त झालाय, जिच्यामुळे माझे पती मला व माझ्या मुलीला बघायला तयार नाहीत. तिच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर माझ्यासारख्या समाजातील अन्यायग्रस्त पीडित मुलींनी समोर यावं व शासनाने त्यांना देखील न्याय द्यावा.

पीडितेच्या वडिलांचे काय आहे म्हणणे ?

माझ्या मुलीला चौसाळा येथे दिलेलं आहे. माझ्या मुलीने मला हृदयरोग असल्याने, तिला होणारा त्रास माझ्यापासून लपवून ठेवला. मात्र ती ज्या वेळेस आजारी पडली त्यानंतर मी तिला जाऊन आणलं व तिच्यावर उपचार केला. त्यावेळी तिने मला सर्व हकीकत सांगितली. मात्र त्यानंतर मी दोन महिने विचार करत होतो, की समाज आपला नाव ठेवेल. आपण पुढे येऊ नये असं वाटत होत मात्र “आता माझं पूर्ण घर जळत आहे, त्यामुळे समाजाचं काय घेऊन बसायचं”, म्हणून पुढे येत आहे.

आज माझ्या मुलीवर अत्याचार झालाय, त्यामुळे मी पुढे येत आहे. आमच्या समाजात लाखो महिलांवर अत्याचार होत आहेत मात्र त्या पुढे येऊ शकत नाहीत, त्यामुळे हे अत्याचार कुठपर्यंत सहन करायचा म्हणून मी माझ्या लेकराला घेऊन पोलीस ठाण्यांमध्ये गेलो. पोलिसांनी देखील आम्हाला खूप मोठी मदत केली आहे. मात्र माझी एकच मागणी आहे, की माझ्या मुलीला व नातीला न्याय मिळावा, हीच विनंती आहे.

पीडित महिलेची मुलगी काय म्हणाली ?

माझे पप्पा माझ्यासमोर माझ्या आईला मारहाण करायचे. मी जेव्हा तिसरीला शिकत होते, तेव्हा मी शाळेतील माझ्या मॅडम जवळ रडत होते. तेव्हा त्या शाळेत शिक्षक असणारे माझे चुलते माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला स्टाफ रूममध्ये नेलं. तिथं ते म्हणाले, की जर तू “आम्ही तुझ्या आईला मारहाण करतो” असं कोणाला सांगितलं. तर तुला जिवंत कापून टाकू. त्यानंतर मी पुन्हा माझ्या मॅडम जवळ कधीच रडले नाही. मी खूप घाबरले होते.

नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे म्हणाले की, ‘पीडितेच्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्यांच्या पतीचे दुसऱ्या एका शिक्षकेसोबत अनैतिक संबंध आहेत. त्याचबरोबर पीडितेला बाजूला करण्यासाठी शिक्षक पतीकडून नेहमी त्रास दिला जायचा. पाच ते सहा वेळा गर्भपात देखील केला आहे. त्यानुसार कलम 498, 313, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


शेअर करा