‘ मोदीजी..फेकने की प्रेरणा आपसे ही मिली ‘ : व्हिडीओ

शेअर करा

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पुरुष भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्याच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिग्गज खेळाडूंपासून ते मोठ्या राजकीय व्यक्तींपर्यंत सर्वजण नीरजची वाहवा करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजात मजेदार पद्धतीने नीरजला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘फेकने की प्रेरणा आपसे मिली ‘ अशा आशयाचा श्याम रंगीलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

भालाफेकीमध्ये सुवर्णपदक मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजला फोन करुन प्रत्यक्षपणे खास शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देतानाचा मोदी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नीरजने केलेली कामगिरी अभिमानास्पद असून संपूर्ण देशाला नीरजवर गौरव असल्याचे मोदी म्हणताना दिसत आहेत मात्र श्याम रंगीला याने मात्र मोदींची नक्कल करत दिलेल्या अशा शुभेच्छा देखील चांगलेच मनोरंजन करत आहेत .

याच व्हिडीओच्या मदतीने श्याम रंगीलाने मोदी यांची मिमिक्री करत नीरजला खास शुभेच्छा दिल्या आहे. श्याम रंगीलाने मोदी यांची हुबेहूब नक्कल केली आहे. नीरजच्या कामगिरीबद्दल देशाला अभिमान असल्याचे श्याम मोदी यांच्या आवाजात म्हणत आहे. तसेच नीरज तुम्ही देशात जेव्हा परताल तेव्हा संपूर्ण भारत तुमच्या स्वागतासाठी सज्ज असेल असे देखील श्याम रंगीला म्हणताना आपल्याला दिसतो.

मोदींचे विरोधक मोदींना ‘फेकू ‘ नावाने संबोधत असतात. तर्कहीन भाष्य आणि जमिनीवरचा काहीच अभ्यास न करता केवळ हवाई दावे यामुळे मोदी यांच्यावर कायम टीका करण्यात येते . मोदींच्या भाषणांना देखील ‘ फेकने ‘ असे म्हणून खिल्ली उडवण्यात येते . त्या पार्श्वभूमीवर भारताला मिळालेले मेडल नेमके ‘ भालाफेक मध्ये मिळालेले असल्याने यांचा संदर्भ जोडून मोदींवर निशाणा साधण्यात येत आहे .

सोशल मीडियावर श्याम रंगीलाची मिमिक्री आणि कॉमेडी पसंद करणारे लाखो लोक आहेत. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला हजारो लाईक्स असतात. श्यामने मोदी यांच्या आवाजात नीरजला दिलेल्या शुभेच्छा नेटकऱ्यांना चांगल्याच आवडल्या आहेत. नेटकरी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. तसेच या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.


शेअर करा