रंगेहाथ धरलेल्या लाचखोर महिला शिक्षणाधिकाऱ्याबद्दल अत्यंत ‘ महत्वाची ‘ बातमी

शेअर करा

लाच घेताना लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आल्यानंतर लगेचच नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. शिक्षणसंस्थेकडून 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलेल्या आणि चौकशीनंतर घरी परतलेल्या वैशाली वीर-झनकर या लगेचच फरार झाल्याने त्यांना शोधण्याचे नवीन आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे .

महिला असल्यामुळे सूर्यास्तानंतर अटक करता येत नसल्यामुळं एसीबीनं समन्स बजावत त्यांना घरी पाठवलं होतं. सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र दुपारी अडीच वाजेपर्यंत वैशाली न्यायालयात हजर न झाल्यामुळे त्यांना लाचलुचपत विभागानं फरार घोषित केलं आहे. लाच स्वीकारण्यासाठी एक व्यक्ती पुढे आल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं होत तर डॉ. झनकर या क्लास वन अधिकारी असल्यामुळे त्यांच्या घरासह मालमत्तेची झडती रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

दरम्यान याच लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेले दोन संशयित वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महिला असल्यामुळे सूर्यास्तानंतर झनकर अटक करता येत नसल्यामुळं एसीबीनं समन्स बजावत त्यांना घरी पाठवलं होतं. सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र दुपारी अडीच वाजेपर्यंत वैशाली न्यायालयात हजर झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण ?

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली पंकज विर उर्फ झनकर (४४) यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. झनकर यांनी तक्रारदाराकडे सुमारे नऊ लाखांची लाचेची मागणी केली होती मात्र फायनल आठ लाख देण्याचे ठरले होते मात्र तक्रारदाराने सापळा रचून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात मंगळवारी (दि.१०) संध्याकाळी अलगद झनकर अडकल्या. पथकाने संशयित चालकासह एका शिक्षकालाही याप्रकरणी ताब्यात घेतले .

शासनाने मंजुर केलेल्या दोन शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरु करण्याकरिता झनकर यांनी कार्यादेश काढण्यासाठी लाचेची रक्कम मागितली होती मात्र तक्रारदार संस्थाचालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्याचे महासंचालकांकडे तक्रार केली होती. महासंचालकांनी तातडीने पावली उचलली. त्यांच्या तक्रारीची शहनिशा करत पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य जाणवले. यानुसार ठाणे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशान्वये मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील सापळा अधिकारी पल्लवी ढगे यांच्या पथकाने नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारालगत सापळा रचण्यात आला .

आठ लाखांची रक्कम स्विकारण्यासाठी झनकर यांचा शासकिय मोटार वाहनचालक ज्ञानेश्वर सुर्यकांत येवले हा जिल्हा परिषदेबाहेरील सिग्नलजवळ आला असता त्याने तक्रारदारकाडून रक्कम स्विकारताच पथकाने त्यास रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता झनकर यांच्या आदेशान्वये त्याने रक्कम घेतल्याचे समजले आणि तातडीने पथकाने जिल्हा परिषदेच्या वास्तुमध्ये धडक देत झनकर यांनाही चौकशीकरिता ताब्यात घेतले सोबतच राजेवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक पंकज रमे दशपुते यांनाही पथकाने ताब्यात घेतले होते .


शेअर करा