नगर हादरले..फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने तरुणीला मोटारसायकलवर बसवले मात्र त्यानंतर..

शेअर करा

फ्लॅट दाखवणे तसेच वकिलास भेटण्याच्या बहाण्याने बावीस वर्षीय तरुणीस हॉटेलमध्ये नेऊन तिचे अश्लील फोटो काढले आणि आणि तिच्यावर अत्याचार केला ह्या आरोपावरून गुरुवारी एका आरोपीला नगरमध्ये अटक करण्यात आली आहे. बुधवारी अकरा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता नगर मनमाड रोडवरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती.

घटना घडल्यानंतर पीडित तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा अमित प्रकाश चांदणे ( राहणार जय भवानी चौक वडगाव गुप्ता तालुका नगर ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपीस अटक केली असून गुरुवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता 16 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पीडित तरुणी ही नगर शहरात राहणारी आहे आरोपी चांदणे व तिचा परिचय होता. फ्लॅट दाखवणे तसेच वकील भेटण्यासाठी येणार आहे, असा बहाणा करून आरोपी तरुणीला त्याच्या मोटर सायकलवरून नगर मनमाड रोडवरील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. रूममध्ये गेल्यानंतर तिला कोल्ड्रिंक पिण्यास दिले त्यानंतर आरोपीने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

तरुणीने त्यास विरोध केला तेव्हा त्याने तिचे अश्लील फोटो काढून इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडितेने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी एस मुंडे करत आहेत.


शेअर करा