पहा व्हिडीओ : प्रेयसीला घेऊन तो हॉटेलबाहेर पडत असतानाच अचानक बायको प्रकटली

शेअर करा

औरंगाबादमध्ये एका महिलेला आपल्या पतीवर संशय आला आणि या संशयामुळे तिने पतीचा पाठलाग करायचं ठरवलं, पतीमागे जात असता तिने एका महिलेला पतीसोबत पाहिलं आणि संतापून तिची जोरदार धुलाई केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. पत्नीने नवऱ्यासोबत असलेल्या प्रेयसीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

औरंगाबाद येथील वरद गणेश मंदिर नजीक हा प्रकार घडला असून अनेक दिवसांपासून बायकोला आपल्या पतीवर संशय होता त्यातून पतीला रंगेहाथ पकडण्याची पत्नी संधी शोधत होती. पतीच्या पाठोपाठ पत्नीने त्याचा पाठलाग केला आणि त्यानंतर पती व त्याची प्रेयसी यांना रंगेहाथ धरले आणि पतीच्या समोरच त्या प्रेयसीची जबरदस्त धुलाई केली .

सदर घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून याच दरम्यान पत्नीने त्या प्रेयसीला जोरदार शिवीगाळ देखील केली. प्रेयसीचे डोके धरून पत्नीने तिला जोरदार मारहाण केली . हतबल झालेला पती मध्ये हस्तक्षेप करत होता मात्र पत्नी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही. ‘ तुम्ही मला सोडा , तुम्ही सरका बाजूला ‘ असे म्हणत पत्नीने या प्रेयसीची जोरदार धुलाई केली. सोशल मीडियात हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून अनेक जणांच्या उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

पतीच्या वागण्या-बोलण्यावर या महिलेला संशय होता. यामुळेच पत्नीने पतीवर पाळत ठेवली त्याचा पाठलाग केला. पती आणि त्याची मैत्रीण कारमधून औरंगाबादच्या वरद गणेश मंदिर जवळील एका हॉटेलमधून जात होती. यावेळी पत्नीने या दोघांना गाठले आणि पतीच्या मैत्रिणीला धू धू धुतले. तसेच पतीलाही एक कानाखाली लगावली. पतीला त्याच्या प्रेयसीसोबत पाहून पत्नी चांगलीच संतापली. तिने आपल्याच स्टाइलने त्याच्या मैत्रिणीला धडा शिकवला. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


शेअर करा