सासू सुनेला म्हणाली ‘ तू परपुरुषाशी संबंध ठेव ‘, महाराष्ट्रातील प्रकरणात वेगळीच माहिती आली समोर

शेअर करा

वंशाला दिवा पाहिजे म्हणून सुनेला चक्क भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे धक्कादायक प्रकरण आष्टी तालुक्‍यात उघडकीस आले होते. याप्रकरणातील सासूने आपली वंशवेल वाढवावी म्हणून आपल्या तीन मुलांसह सहा सुना आणल्याची बाब देखील आता समोर आली आहे. पीडित महिला साडेपाच महिन्यांची गर्भवती आहे आणि अवघडलेल्या अवस्थेत तिला पोलीस ठाण्यात आणि कोर्टात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

कडा कारखाना परिसरात राहणारे हे कुटुंब गावी गावी नंदीबैल नेऊन भिक्षा मागून उदरनिर्वाह करते. तीन मुले आई वडील असा हा परिवार असून तीनही मुलांची लग्न झाली मात्र एकालाही अपत्य झाले नाही. त्यामुळे सासूने एका मुलाचे तीन जणींशी लग्न लावले होते मात्र तरीही एकही नांदली नाही तर दुसऱ्या मुलाच्या पत्नीने त्याच्यापासून काडीमोड घेतला. पीडित सून ही पतीची दुसरी पत्नी असून पहिल्या पत्नीला मूलबाळ न झाल्याने तिच्याशी फारकत घेतल्याची माहिती आहे. दुसऱ्या पत्नीला टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून मुलगी झाली मात्र तेवढ्यावर सासूची हौस भागली नाही.

वारस म्हणून मुलगाच हवा या इर्षेने पेटलेल्या सासूने पीडित 29 वर्ष सुनेला जीवे मारण्याची धमकी देत स्वतःच्या 23 वर्षीय अविवाहित असलेल्या भाच्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. दोन ऑगस्ट रोजी आष्टी ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यासाठी पोलिसांनी देखील पीडित महिलेला देखील तीन दिवस चकरा मारायला लावल्या, असाही आणखी धक्कादायक प्रकार समोर आला आहे .

तक्रार दाखल झाल्यानंतर पतीला आणि सासर्‍याला अंतरिम जामीन मिळाला असून आरोपी असलेला नराधम तरुण आणि सासू मात्र फरार झाले आहेत. विशेष म्हणजे पीडितेच्या साडेचार वर्षाच्या मुलीला देखील सासूने सोबत पळून नेले आहे. आरोपींना 14 ऑगस्टपर्यंत अटक करावी अन्यथा 15 ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा पीडित महिलेने दिला आहे.

पीडितेचे वकील शुभम पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, ‘ पीडितेला आरोपीचे काही नातेवाईक धमकावत आहेत. याबाबत पोलिस अधीक्षकांकडे ई-मेल द्वारे तक्रार देखील केलेली आहे. दोन आरोपींचा अंतरिम जामीन रद्द करावा आणि सर्व आरोपींना अटक करावी ‘, अशी मागणी केली असल्याचे सांगितले आहे.

काय आहे पीडित महिलेची तक्रार ?

माझं लग्न गेल्या 15 वर्षांपूर्वी आष्टी तालुक्यातील कडा परिसरात राहणाऱ्या मोठोबा भिसे यांच्याशी झाला आहे. आम्ही नंदी बैलाच्या माध्यमातून भिक्षा मागून कुटुंबाची उपजीविका भागवत असून 2016 मध्ये माझ्या पतीसह सासू-सासर्‍यांनी मला न सांगता अहमदनगर येथील देशपांडे हॉस्पिटलमध्ये टेस्ट ट्यूब बेबी करून घेतली आणि मला मुलगी झाली. मात्र त्यानंतर 2020 मध्ये माझ्या सासूने मला सांगितले की, ‘तुझा नवरा बाप होऊ शकत नाही”. मला यावर विश्वास बसला नाही, त्यामुळे मी माझ्या पतीला विचारून याची शहानिशा केली आणि त्यांनी देखील मला तेच सांगितले त्यामुळे मला एकच धक्का बसला.

एक महिन्यानंतर माझे पती कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना सासू म्हणाली की, “तुझा नवरा कधीच बाप बनू शकत नाही, त्यामुळे आपला वंश चालविण्यासाठी तुला एक मुलगा होणे गरजेचे आहे म्हणून तू माझ्या भावाचा मुलगा देव यादव सोबत याच्यासोबत तू शारीरिक संबंध ठेवून आम्हाला एक मुलगा दे. असल्या गोष्टीला मी नकार दिला असता माझ्या सासू-सासर्‍यांनी मला खूप मारहाण केली त्यानंतरही मी नकार दिला मात्र सततच्या मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून नाईलाजास्तव मी या गोष्टीला तयार झाले.

3 जानेवारी 2021 रोजी माझ्या सासू-सासर्‍यांनी देव यादव असणाऱ्या घरामध्ये मला बळजबरीने पाठवलं आणि ते दोघेही दाराबाहेर थांबले. त्यानंतर अनेक वेळा माझ्या सासू-सासऱ्यांचा दबावाखाली त्याने घरी येऊन माझ्यासोबत जबरदस्ती केली. असा प्रकार होतेवेळी सासू घराबाहेर थांबत असे तसेच माझ्यासोबत असा प्रकार करण्यासाठी सासू देव यादवला खर्च-पाण्यासाठी पैसेही देत असे. काही दिवस असाच प्रकार सुरु राहिल्यानंतर काही दिवसांनी मी गरोदर राहिल्याचे समजताच सासू-सासरे मला हॉस्पिटलमध्ये देखील घेऊन गेले आणि त्यांनी पेढे देखील वाटप केले.

सदर बाब माझ्या पतीला समजताच त्यातून वाद तयार झाला आणि त्यांनी माझ्या भावाला बोलवून मला माहेरी पाठवलं. सध्या मी पाच महिन्यांची गरोदर असून माझ्यापुढे जगण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे . वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासू – सासऱ्यांनी हे कृत्य करण्यास भाग पाडलं. मी गरोदर राहिल्यावर पेढे वाटले, अनेकांना दारू पाजली. मात्र आज पोटात असणाऱ्या बाळाला, बापाचं नाव काय द्यावं, असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला आहे. एवढंच नाही तर आता आमच्या समाजातील लोक देखील उलटसुलट बोलत आहेत. जातीतून बाहेर काढायचं नाव घेत आहेत. त्यामुळे माझ्या माहेरी देखील मी कशी राहू ?

पीडित महिलेच्या भावाचे काय आहे म्हणणे ?

2 तारखेला आम्ही तक्रार केली आहे. आज 10 तारीख उलटून गेली तरी एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. आज समाज आम्हाला नाव ठेवतोय. तिचा नवरा तिला घरात घ्यायला तयार नाही. ज्याने हे केलंय तो मुलगा देखील तिला घरात घ्यायला तयार नाही. आणि असं असताना हे मिटवण्यासाठी समाजातील लोक पैसे घ्या म्हणतात. पण पैसे घेऊन आम्ही काय करावं ? आज या पाच महिन्याच्या गर्भाला नाव कुणाचा द्यावं ? त्यामुळे समाज आणि सरकारने आम्हाला न्याय द्यावा ?


शेअर करा