बंटी-बबलीची चोरीची पद्धत ऐकून पोलीस देखील गेले चक्रावून ..’ असा ‘ असायचा मास्टरप्लॅन ?

शेअर करा

एकीकडे सर्व जगात कोरोनाचे थैमान सुरु असताना पोलीस यंत्रणेचे लक्ष कोरोनाच्या रोकथामाकडे जास्त आहे मात्र याचा फायदा घेत गुन्हेगार जास्त सक्रिय झाल्याचे गेल्या काही दिवसात पहायला मिळालेले आहे . दिवसा घर साफ करण्याचे साहित्य विकण्याचे नाटक करत ते दोघे रेकी करत असत आणि योग्य वेळ येताच रात्री घरच साफ करत असत,अशा एका पुण्यातील बंटी बबलीच्या जोडीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे .

रामा पापा जाधव उर्फ रामा सोनाजी कांबळे (वय २५, रा. शिवाजीनगर), उषा रामा कांबळे (वय २८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक दुचाकी, गुन्हा करण्यासाठी लागणारी कटावणी, एक स्क्रू ड्रायव्हर असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल व ४५ ग्रॅम सोने जप्त केले असून पाच घरफोडीचे गुन्हे त्यांनी आतापर्यंत कबूल केले आहेत .

पुण्यातील लष्कर, भारती विद्यापीठ, कोरेगाव पार्क, कामशेत या परिसरात त्यांनी बहुतांश गुन्हे केले आहते . पोलीस अटकेत असलेल्या एका दुसऱ्या सराईत गुन्हेगाराची चौकशी करत असताना त्यांना ह्या बंटी बबलीची माहिती मिळाली, सोबतच त्यांचे पुढील टार्गेट काय राहणार आहे, ही देखील माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस यंत्रणेने सापळा रचला. वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्या दोघांना अटक करण्यात आली.

पोलीस तपासात आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे आढळून आले आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात २६ पेक्षा जास्त घरफोड्या केल्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गुन्हेगारी जगतात दोघेही बंटी व बबली नावाने फेमस आहेत. दिवसा साफसफाई करण्यासाठी लागणारे झाडू, ब्रश आदी साहित्य घेऊन विविध सोसायट्यांमध्ये फिरत असत , अर्थात याचा उद्देश हा फक्त रेकी करणे हाच असायचा. याचदरम्यान ही जोडी बंद फ्लॅट हेरायचे आणि योग्य वेळ येताच हात साफ करून गायब व्हायचे .दोघांना अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांची ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.


शेअर करा