लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्यावर मोठी कारवाई ? न्यायालयाच्या निर्णयाने पाय आणखी खोलात

शेअर करा

लाचखोरीच्या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे . त्यांच्या जामीन अर्जाबाबत त्यानंतरच विचार करण्यात येणार आहे. डॉ. वैशाली झनकर यांना शुक्रवारी सकाळी एसीबीने अटक केली होती यानंतर त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

जिल्हा कोर्टाने दिलेल्या कोठडीची मुदत शनिवारी (दि.१४) संपल्याने त्यांना जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी एसीबीने आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती दिली. तर बचाव पक्षाने सुद्धा आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने वैशाली झनकर यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. एसीबीच्या तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. झनकर यांनी आपला जामीन अर्ज सादर केला असून पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतरच त्यावर सुनावणी होऊ शकते. ठाणे पोलिसांचे एक पथक सध्या नाशिकमध्ये असून झनकरांची चौकशी सुरू आहे.

शाळेचे अनुदान मंजुरीच्या मोबदल्यात आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडण्यात आलेल्या आणि गुन्हा दाखल झालेल्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर या फरार झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने न्यायालयांत जाहीर केल्याने झनकर नक्की पळाल्या की जाणीवपूर्वक यांना पळविण्यात आले अशी चर्चा होऊ लागताच त्यांना अटक करण्यात आली होती. रात्र झाल्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांना घरी सोडण्यात आले मात्र दुसऱ्या दिवशी त्या पोलिस ठाण्यात आल्याच नाहीत तसेच न्यायालयात देखील हजर झाल्या नाहीत त्यानंतर त्यांना फरार म्हणून घोषित करण्यात आले होते मात्र अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

काय आहे प्रकरण ?

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली पंकज विर उर्फ झनकर (४४) यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. झनकर यांनी तक्रारदाराकडे सुमारे नऊ लाखांची लाचेची मागणी केली होती मात्र फायनल आठ लाख देण्याचे ठरले होते मात्र तक्रारदाराने सापळा रचून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात मंगळवारी (दि.१०) संध्याकाळी अलगद झनकर अडकल्या. पथकाने संशयित चालकासह एका शिक्षकालाही याप्रकरणी ताब्यात घेतले .

शासनाने मंजुर केलेल्या दोन शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरु करण्याकरिता झनकर यांनी कार्यादेश काढण्यासाठी लाचेची रक्कम मागितली होती मात्र तक्रारदार संस्थाचालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्याचे महासंचालकांकडे तक्रार केली होती. महासंचालकांनी तातडीने पावली उचलली. त्यांच्या तक्रारीची शहनिशा करत पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य जाणवले. यानुसार ठाणे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशान्वये मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील सापळा अधिकारी पल्लवी ढगे यांच्या पथकाने नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारालगत सापळा रचण्यात आला .

आठ लाखांची रक्कम स्विकारण्यासाठी झनकर यांचा शासकिय मोटार वाहनचालक ज्ञानेश्वर सुर्यकांत येवले हा जिल्हा परिषदेबाहेरील सिग्नलजवळ आला असता त्याने तक्रारदारकाडून रक्कम स्विकारताच पथकाने त्यास रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता झनकर यांच्या आदेशान्वये त्याने रक्कम घेतल्याचे समजले आणि तातडीने पथकाने जिल्हा परिषदेच्या वास्तुमध्ये धडक देत झनकर यांनाही चौकशीकरिता ताब्यात घेतले सोबतच राजेवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक पंकज रमे दशपुते यांनाही पथकाने ताब्यात घेतले होते .

डॉ. वैशाली झनकर वीर यांसह प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. दशपुते आणि येवले न्यायालयीन कोठडीत असून डॉ. झनकर पोलीस कोठडीत आहेत. वाहनचालक येवले याला शुक्रवारी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी निलंबित केले. तर दशपुते याच्या निलंबिताचे आदेश शनिवारी (दि.१४) काढण्यात आले.

डॉ. झनकरांवरील शिस्तभंग आणि निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव पुणे येथील शिक्षण आयुक्तांकडे प्रलंबित आहे. मात्र, मंगळवारी (दि. १०) लाच स्वीकारल्यानंतर चार दिवसांपासून माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर कोणीही प्रभारी अधिकारी नियुक्त झालेले नाहीत. डॉ. झनकरांच्या निलंबनाचे आदेश लवकरच निघण्याची शक्यता आहे .

डॉ. वैशाली झनकर वीर यांना यांच्यावरही निलंबनाची कारवाई होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. शासकीय अधिकारी ४८ तास कोठडीत राहिल्यानंतर त्यांचे निलंबन अटळ असते. त्यानुसार निलंबनाच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झाला नसला, तरी मंगळवारपर्यंत (दि.१७) शिक्षणाधिकारी झनकरांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.


शेअर करा