चिमुरडीची तक्रार ऐकून पोलीस तिच्या घरी गेले तर ‘ आतील ‘ दृश्य पाहून पोलिसही हादरले

शेअर करा

आई दरवाजा उघडत नव्हती म्ह्णून चिमुकलीने टाहो फोडला आणि घाबरलेल्या अवस्थेत ती पोलीस स्टेशनला पोहचली. पोलिसांनी तात्काळ तिची दखल घेत तिचे घर गाठले आणि दरवाजा तोडून आला प्रवेश केला असता आतील दृश्य पाहून पोलिसही सैरभैर झाले. संबंधित मुलीच्या आईचा देह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला पोलिसांना दिसला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करत तिला खाली उतरवले आणि पाठीवर पंप केल्यानं महिलेचा श्वासोच्छवास पुन्हा सुरू झाला.

उपलब्ध माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी नाशिक येथील गंजमाळमधील भीमवाडीत ही घटना घडली आहे. संबंधित महिला याठिकाणी आपला पती आणि मुलासोबत वास्तव्याला आहे. शुक्रवारी दुपारी घरी कोणी नसताना तिने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित महिला गतप्राण झाली असावी असं पोलिसांनाही प्रथमदर्शीनी वाटलं होतं. योग्य वेळी पोलीस पोहचल्यानंतर महिलेला खाली उतरवल्यानंतर पाठीवर पंप केल्यानं त्यांचा श्वासोच्छवास पुन्हा सुरू झाला असून पोलिसांनी तातडीनं तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पोलिसांपर्यंत पोहचलेल्या मुलीचे वय अवघे ५ वर्षे असून तिच्या धाडसाचे परिसरात कौतुक केले जात आहे.

नेमकं काय घडलं होत ?

शुक्रवारी दुपारी 5 वर्षीय चिमुकली घराबाहेर खेळत असताना महिलेनं अचानक घराचा दरवाजा लावून घेतला.आईनं दरवाजा का लावून घेतला याबद्दल चिमुकलीला काहीच माहिती नव्हते . खेळून झाल्यावर ती घरी पोहचली तर आईने दरवाजा आतून बंद केलेला होता. आईनं दार उघडावं म्हणून ती बरेच प्रयत्न करत होती. तिने दरवाजा ठोठावला आणि हाका मारल्या पण आतून काही प्रतिसाद आला नाही.

मुलीने विलंब न करता नजीकच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनीही क्षणभरही विलंब न करत घराकडे धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता महिलेचा देह लटकलेल्या अवस्थेत आढळला. मुलीच्या प्रसंगावधानामुळे आणि पोलिसांनी तातडीनं कारवाई केल्यानं महिलेचा प्राण वाचला आहे. आणखी थोडा उशीर झाला असता, तर चित्र काहीसं वेगळं असतं, अशी भावना स्थानिकांनी बोलून दाखवली आहे सोबतच तिची मुलगी आणि पोलिसांचे देखील तात्काळ दखल घेत जागेवर पोहचल्यामळे कौतुक केले जात आहे.


शेअर करा