ऐका ऑडिओ : ‘ त्या ‘ क्लीपने साटेलोटे अडचणीत ? ,नगरमध्ये महिलेला पुढे करून पत्रकारांना धमक्या

शेअर करा

पोलिस ठाण्यातून मी कारवाईला येतोय, जेवढी वाहने काढून निघून जाता येईल तेवढी वाहने घेऊन जा. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत सर्व बंद करा’ अशा आशयाची एक पोलीस अधिकारी व अवैध व्यवसायिक यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप नेवासा तालुक्यात व्हायरल झाली होती मात्र त्यानंतर नेवासा इथे काही पत्रकारांना चक्क एक महिला फोन करून ‘ सदर व्हायरल क्लिपने केलेली बदनामी थांबवा अन्यथा .. ‘ अशा स्वरूपाचे फोन येऊ लागले आहेत . आम्ही नेवासकर या चॅनेलचे पत्रकार श्री. सौरभ मुनोत यांना असाच एका महिलेचा कॉल आला त्यात ती महिला, मी एका आर्मी ऑफिसरची बायको असून तुम्ही ‘ व्हायरल क्लिपच्या बातम्या थांबवा, अशी धमकी देताना दिसत आहे.

काय आहे प्रकरण ?

नेवासा तालुक्यासह जिल्ह्यात व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये, एक पोलीस अधिकारी समोरच्या व्यक्तीला ‘ तुम्ही पिंपळगावमध्ये उच्छाद मांडला आहे. त्यामुळे सगळ्यांचे धंदे कायमस्वरूपी बंद करा. मी पोलीस स्टेशनमधून पिंपळगाव येथे येण्यासाठी निघालो आहे. वाहने काढून घेता येईल तेवढे काढून घ्या नाहीतर ती जप्त करण्यात येतील. इथून पुढे माझा आदेश येईपर्यंत तुमचे काम बंद राहील ‘, अशा आशयाची व्हायरल क्लिप नेवासा तालुक्यात फेसबुक आणि व्हाट्सअपमधून व्हायरल झाली होती.

ही क्लिप कोणी व्हायरल केली ? ही वाहने कसली होती ? आणि समोरील बोलणारी व्यक्ती कोण ? हा पोलीस अधिकारी देखील नेमका कोण ? याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली होती मात्र ही क्लिप व्हायरल झाल्याने नेवासा परिसरात अवैध धंदे आणि त्यांचे प्रशासनामधील कथित हस्तक यांचे चांगलेच धाबे दणाणले त्यामुळे आता चक्क एक महिला पत्रकाराला धमकावत असल्याने या महिलेचा ‘ बोलविता धनी ‘ कोण ? हा देखील प्रश्न उभा झाला आहे .

नगर इथे देखील अवघ्या काही दिवसापूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे नेते योगेश साठे यांना देखील रस्त्यात अडवून धमकावण्यात आले होते तसेच त्यांच्या गाडीचे देखील नुकसान करण्यात आले होते . नगर शहर व जिल्ह्यात माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार यांना धमकावण्याचे प्रकार गंभीर असून नेवासा येथील व्हायरल क्लिप प्रकरणात प्रथमच एखाद्या महिलेला पुढे करून धमकावण्यात आल्याचा नवीनच प्रकार समोर आल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार यांचा आवाज दाबण्यासाठी तथाकथित प्रवृत्ती कुठल्याही थराला जाऊ शकतात, हे देखील स्पष्ट झाले आहे .

काही महिन्यांपूर्वीच राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या देखील करण्यात आली होती. पत्रकार दातीर हे मल्हारवाडी रस्त्याने घरी जात असताना सहा एप्रिल 2021 रोजी एका स्कॉर्पिओ मधून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. राहुरी शहरातील कॉलेज रोडवर त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी दोषी व्यक्तींना पाठी घालणाऱ्यांना देखील कठोर शासन होणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार यांना या प्रवृत्ती जगणे अवघड करून टाकतील.


शेअर करा