सावत्र आईचा ‘ असा ‘ कारनामा की दोन राज्यातील पोलिसही झाले हैराण , अखेर मुलगा म्हणाला…

सध्या कोरोनामुळे अनेक जणांचे संसार अडचणीत आलेले आहेत . अनेक ठिकाणी कर्ते व्यक्ती घरातून गेले आहेत तर काही ठिकाणी उधारी आणि आर्थिक अडचणींनी जगणे मुश्किल केलेले आहे मात्र अशाच आर्थिक अडचणीतून झालेल्या वादातून चक्क सावत्र आईने आपल्या तरुण मुलाची हत्या केल्याची घटना गुजरातमध्ये उघडकीस आली आहे . अहमदाबाद येथील दस्करोई तालुक्यातील कुंजड येथील ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सदर महिलेचे वय हे ४८ वर्षे असून तिचे नाव गौरी पटेल असून तिने ज्याचा खून केला त्या सावत्र मुलाचे नाव हार्दिक पटेल असे आहे . हार्दिकचा लहान भाऊ उमंग पटेल हा कांभा भागात डेअरी चालवत असून त्यांने दिलेल्या जबाबात सांगितलं की, आई गौरी आणि हार्दिक नेहमी पैशांवरुन भांडण करीत होते. माझी सावत्र आई आमच्या डेअरी व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली नातेवाईक आणि वडिलांच्या मित्रांकडून पैसे उधार घेत होती मात्र हे पैसे तिने कधीच डेअरीसाठी खर्च केले नाही.

उमंगच्या म्हणण्यानुसार , गौरीने असं करीत करीत नातेवाईकांकडून 25 लाख रुपयांची उधार घेतली होती मात्र हार्दिकला कोरोना, लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे डेअरी व्यवसायाला नुकसानाचा सामना करावा लागला मात्र आईने घेतलेल्या या पैशातून हार्दिकला कधीच मदत केली नाही. जेव्हा या नातेवाईकांनी पैसे परत मागितले तेव्हा नेमका प्रकार समोर आला आणि त्यावरून आई गौरी व हार्दिक यांच्यात भांडणे सुरु झाली.

मंगळवारी सकाळी हार्दिक घरात एकटा झोपलेला होता आणि उमंग डेअरीवर होता. गौरीने नाशिकमधील आपले तीन नातेवाईक संजय, अनिल, दिनेश यांना बोलावून घेतले होते . त्यांनी सोबत मिळून हार्दिकचा गळा आवळला आणि त्याचा खून केला. उमंग जेव्हा घरी परतला त्याने गौरीकडे याबाबत विचारणा केली. मात्र तिने स्पष्ट उत्तर दिलं नाही. यावेळी त्याने शेजारच्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की, गौरीचे तीन नातेवाईक एका गोणीत काही तरी भरून घेऊन जात होते.

शेजाऱ्यांचे बोलणे ऐकून उमंगला शंका आली होती मात्र त्यानंतर पोलिसांना कांभा येथील झाडाझुडपांमध्ये एक मृतदेह सापडला आणि हा हार्दिकच होता. या प्रकरणात गौरीची चौकशी केल्यानंतर तिने आपल्या तीन नातेवाईकांची नावं सांगितली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार , ‘ प्राथमिक तपासात हा वाद हा आर्थिक कारणाने झाल्याचे दिसत आहे मात्र प्रकरणाची चौकशी सुरु असून सत्य बाहेर येईल ‘ असे सांगण्यात आले आहे . गौरी हिने याआधी देखील २०१४ मध्ये नाशिकमध्ये काम करत असताना आपल्या 11 वर्षांच्या मुलाचीही हत्या केली होती मात्र त्यावेळी पोलिसांना खोटं कारणं सांगून ती यातून सुटली होती. त्यानंतर 2015 मध्ये तिचं दुसरं लग्न हार्दिकच्या वडिलांसोबत झालं होत .