मनसेची धमकी श्रीमंत कोकाटेंनी अक्षरश: ‘ ह्या ‘ शब्दात लावली उडवून

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संभाजी ब्रिगेडमधील वाद आता पेटण्याची शक्यता निर्माण झाली असून ‘ राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचं आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली होती. गायकवाड यांच्या टीकेला मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दम भरताना , ‘ लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करु ‘, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला होता. मोरे यांच्या या इशाऱ्याला आता श्रीमंत कोकाटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले श्रीमंत कोकाटे ?

मनसेनं प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरु देणार नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. पुणे कुण्याच्या बापाचं नाही. छत्रपतींची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाया पडून, लोटांगण घातलं म्हणजे खूप मोठे झालो अशा भ्रमात राहू नका. जो जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करेल तो व्यक्ती महाराष्ट्राचा शत्रू आहे, तो शिवरायांचा शत्रू आहे . राज ठाकरे यांच्यावर तरुण मुलं खूप प्रेम करत होती, म्हणून त्यांनी त्यावेळी 13 जागा जिंकता आल्या पण आता काय परिस्थिती आहे याचं आत्मचिंतन मनसेनं करावं .

काय आहे प्रकरण ?

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका करताना, ‘ राज ठाकरे म्हणजे राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला माणूस आहे. त्यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्या पलीकडं इतिहासाचं आकलन नाही. त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचंही आकलन नाही. पुरंदरेंनी जेम्स लेनच्या पुस्तकाचा प्रचार का केला हा प्रश्न विचारण्याचं धाडस राज ठाकरेंनी दाखवावं,’ असं म्हटलं होत सोबतच प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणाचा अभ्यास करण्याचा सल्लाही त्यांनी राज यांना दिला होता .

राष्ट्रवादी काँग्रेसमुळं राज्यात जातीय अस्मिता टोकदार झाली, असे राज ठाकरे म्हणाले होते त्यानंतर हा वाद सुरु झाला. जेम्स लेनला मराठा तरुण-तरुणींपर्यंत कुणी पोहोचवलं?,’ असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टीका करणारे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर मनसेच्या नेत्यांनी लगेचच दमबाजी सुरु केल्याचे पहायला मिळाले. ‘लायकीत राहा, नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू,’ असा इशारा मनसेचे स्थानिक नेते वसंत मोरे यांनी प्रवीण गायकवाड यांना दिला होता .

काय म्हणाले मनसे नेते वसंत मोरे ?

२०१९ च्या लोकसभेला तू पुण्यातून इच्छुक होतास. मी प्रवीण गायकवाड, मी प्रवीण गायकवाड असं सांगत गल्लोगल्ली फिरत होतास. तुला राज ठाकरे काय कळणार ? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू,’ असा इशारा मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी दिला तर मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील गायकवाड यांच्यावर टीका केली आहे मात्र त्यांनी गायकवाड यांचे नाव घेतलेले नाही. त्या म्हणतात की, ‘ राजसाहेब ठाकरे हे नेहमी जातीपातीच्या पलीकडच्या राजकारणातील घटना सांगतात. रोखठोक बोलतात. योग्य ते योग्य, चूक ते चूक अशी स्पष्ट भूमिका घेतात. एकविसाव्या शतकात महाराष्ट्राचे व्हिजन, भविष्यासंदर्भात बोलतात. माणुसकी ही एकच जात आणि महाराष्ट्र हा एकच धर्म मानतात. तरीही काही असंतुष्ट, बिनकामी लोकांना बोलायचे असेल तर त्यांनी चौकटीत बोलावं . पात्रता सोडून बोललात तर महाराष्ट्र सैनिक व राजदूतांना पात्रता सोडून जशास तसं छान उत्तर देता येतं. आमचे राज साहेब नुसतं बोलत नाहीत तर कामही प्रचंड करतात. उगीच लोक ‘कृष्णकुंज’वर अडचणी घेऊन येत नाहीत ‘ .


शेअर करा