नेवाश्यासह जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या ‘ त्या ‘ प्रकरणाचा तपास संदीप मिटके यांच्याकडे , रहस्य उलगडणार ?

शेअर करा

नेवासा तालुक्यासह जिल्ह्यात धुमाकूळ उडवून देणाऱ्या नेवासा येथील पोलीस अधिकाऱ्याच्या ‘ त्या ‘ क्लिपची चौकशी आता श्रीरामपुरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करणार आहेत. ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची मागणी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याने पुढील चौकशी श्रीरामपुरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.संदीप मिटके यांच्याकडे हा तपास आल्याने ‘ हा ‘ आवाज नक्की कोणाचा होता यापाठीमागील रहस्य देखील बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे . सदर क्लिप व्हायरल झाल्यानंतर एका महिलेने नेवासा येथील काही पत्रकारांना देखील ‘ ती क्लिपची बातमी बंद करा ‘ , असे धमकावले होते . संदीप मिटके यांच्या हाती तपास आल्याने आता ‘ हा ‘ देखील आवाज कुणाचा हे समोर येणार आहे .

काय आहे प्रकरण ?

नेवासा तालुक्यासह जिल्ह्यात व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये, एक पोलीस अधिकारी समोरच्या व्यक्तीला ‘ तुम्ही पिंपळगावमध्ये उच्छाद मांडला आहे. त्यामुळे सगळ्यांचे धंदे कायमस्वरूपी बंद करा. मी पोलीस स्टेशनमधून पिंपळगाव येथे येण्यासाठी निघालो आहे. वाहने काढून घेता येईल तेवढे काढून घ्या नाहीतर ती जप्त करण्यात येतील. इथून पुढे माझा आदेश येईपर्यंत तुमचे काम बंद राहील ‘, अशा आशयाची व्हायरल क्लिप नेवासा तालुक्यात फेसबुक आणि व्हाट्सअपमधून व्हायरल झाली होती.

ही क्लिप कोणी व्हायरल केली ? ही वाहने कसली होती ? आणि समोरील बोलणारी व्यक्ती कोण ? हा पोलीस अधिकारी देखील नेमका कोण ? याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली होती मात्र ही क्लिप व्हायरल झाल्याने नेवासा परिसरात अवैध धंदे आणि त्यांचे प्रशासनामधील कथित हस्तक यांचे चांगलेच धाबे दणाणले होते. त्यानंतर चक्क एक महिला पत्रकाराला धमकावत असल्याने या महिलेचा ‘ बोलविता धनी ‘ कोण ? हा देखील प्रश्न उभा झाला होता .

नेवासा इथे काही पत्रकारांना चक्क एक महिला फोन करून ‘ सदर व्हायरल क्लिपने केलेली बदनामी थांबवा अन्यथा .. ‘ अशा स्वरूपाची धमकी देत होती . मी एका आर्मी ऑफिसरची बायको आहे असे ती म्हणत होती मात्र स्वतःचे नाव मात्र सांगत नव्हती. आम्ही नेवासकर या चॅनेलचे पत्रकार श्री. सौरभ मुनोत यांना असाच एका महिलेचा कॉल आला होता त्यात ती महिला, मी एका आर्मी ऑफिसरची बायको असून तुम्ही ‘ व्हायरल क्लिपच्या बातम्या थांबवा, अशी धमकी देताना दिसत होती .

नगर शहर व जिल्ह्यात माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार यांना धमकावण्याचे प्रकार गंभीर असून नेवासा येथील व्हायरल क्लिप प्रकरणात प्रथमच एखाद्या महिलेला पुढे करून धमकावण्यात आल्याचा नवीनच प्रकार समोर आल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार यांचा आवाज दाबण्यासाठी तथाकथित प्रवृत्ती कुठल्याही थराला जाऊ शकतात, हे देखील स्पष्ट झाले आहे .पत्रकारांना धमकावणाऱ्या दोषी व्यक्तींना पाठी घालणाऱ्यांना देखील कठोर शासन होणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार यांना या प्रवृत्ती जगणे अवघड करून टाकण्याची शक्यता आहे .


शेअर करा