पुण्यात ‘ ह्या ‘ ठिकाणी उभे राहिलेय मोदींचे मंदीर , भक्ताचा दावा आहे की ..

शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त ( अंधभक्त ? ) त्यांना काय उपमा देतील याचा नेम राहिलेला नाही. पुण्यात तर अशाच एका मोदी भक्ताने पंतप्रधान मोदींना चक्क देवाचा दर्जा देऊन त्यांचे मंदिरच उभारले आहे. त्यामुळे पुणेकर सुद्धा दक्षिण भारतीय लोकांपेक्षा कमी नाहीत हे सिद्ध झाले आहे. सर्वसामान्य लोकांसाठी मोदींचे मंदिर हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.आपण अनेकदा मोदीभक्त किंवा त्यांच्या भक्तांसाठी वापरला जाणारा अंधभक्त असा शब्दही ऐकला असेल पण त्याच भक्ताने मोदींचे मंदिर उभारल्याने या भक्ताची आणि त्या मंदिराची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे .

पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले आहे तर मंदिरात मोदींचा पुतळा देखील ठेवण्यात आलेला आहे . जयपूरमधून हा पुतळा बनवून घेतला असल्याने आतापर्यंत या मंदिराला तब्बल 1 लाख 60 हजार रुपये खर्च आलेला आहे. 15 ऑगस्ट 2021 दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. खाजगी जागेत हे मंदिर उभारलेले असल्याने अनेक भक्तांना लांबूनच केवळ ‘ मुखदर्शन ‘ घेऊनच समाधान मानावे लागणार आहे.

मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली एक कविता मोदी भक्तांकरिता लावण्यात आली आहे तसेच मंदिराबाहेर असलेल्या फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कारनाम्यांचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. मंदिरावरून मला विरोधकांनी ट्रोल केलं गेलं तरी चालेल, पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते , असा मयूर मुंढे यांचा दावा आहे .

काही दिवसांपूर्वी भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनीही मोदीस्तुती करणारे एक ट्विट केले होते. ट्विटमध्ये म्हटलं होतं की नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार आहेत. ते देवासमान आहेत. ते देशाची सेवा करत आहे. या विषयावर विरोधकांनी टीका टिप्पणी केली होती. त्यानंतर आता तर थेट मोदींचे मंदिर उभारले गेले आहे त्यामुळे आता इथे किती जण जाऊन दर्शनाचा लाभ घेतात ते येत्या काळात पाहावे लागेल .


शेअर करा