पुणे हादरले..इंस्टाग्रामवरच्या ‘ प्रगती ‘ चे असले कारनामे उघड झाल्याने पोलिसही हैराण

शेअर करा

सोशल मीडियाचा अनेक जण करतात मात्र याचाच वापर करून महिला देखील हनी ट्रॅपच्या वापराने ब्लॅकमेल करू शकतात अशी घटना पुण्यात समोर आली आहे. फक्त नववी पास मात्र विवाहित असणाऱ्या एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यासह इतर शहरातील अनेक व्यावसायिक आणि नोकरदार पुरुषांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवले आहे . विशेष म्हणजे आरोपी महिलेने आपल्या नवऱ्याच्या मित्राच्या मदतीनं हे हनी ट्रॅपचं जाळ बनवलं होत आणि त्यात अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे . पुण्यातील कोंढवा पोलिसांनी सेक्सटॉर्शन करणाऱ्या संपूर्ण टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मुख्य आरोपी महिला इयत्ता नववी पास असून तिचा पतीही गुन्हेगार वृत्तीचा असून सध्या तुरुंगात आहे याच दरम्यान या महिलेची तिच्या पतीच्या मित्राशी ओळख झाली आणि या ओळखीतून त्यांनी सोशल मीडियावरून उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा उद्योग सुरू केला होता. आरोपींना आतापर्यंत पुण्यातीला अनेकांना आपल्या जाळ्यात गुंतवलं असल्याचा अंदाज आहे. न्यू पनवेल इथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाची फसवणूक केली आणि त्यानंतर तिला हा प्रकार चांगलाच महागात पडला.

समाजात आणि सोशल मीडियावर बदनामी होण्याच्या भीतीनं अनेकजण आरोपींच्या दबावाला आणि धमक्यांना बळी पडले आहेत. पण चार दिवसांपूर्वी एका व्यावसायिकानं धाडस दाखवत याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पोलीस कामाला लागले. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या 72 तासांत मुख्य आरोपीसह हनी ट्र्रॅप करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली असून पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

काय आहे प्रकरण ?

न्यू पनवेल इथं राहणाऱ्या ३१ वर्षीय तरूणाची पुण्यातल्या एका महिलेसोबत इन्स्टाग्रावर ओळख झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर देखील शेअर केले आणि त्यातून बोलणं वाढत गेलं आणि त्यांच्यात मैत्री झाली. या महिलेनं तरूणाला पुण्यात शरीरसंबंधांचे आश्वासन देत भेटायला बोलावलं. पीडित तरूण हा ७ ऑगस्टला कोंढव्यातल्या येवलेवाडी इथं महिलेला भेटायला आला आणि या महिलेनं तरूणाला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

महिलेसोबत काही वेळ घालवल्यानंतर हा तरुण तेथून निघाला आपल्या कारने पनवेलकडे जात असताना त्याला रस्त्यात ३ जणांनी अडवलं आणि जबरदस्तीने कारमध्ये बसत ”तू या महिलेवर बलात्कार केला आहे. आम्ही तुझ्याविरोधात पोलिसांत तक्रार देणार आहोत” असं म्हणत तरूणाला धमकावलं. पैसे दिले नाही तर महिलेसोबत लग्न करावं लागेल, असं कागदावर लिहून घेतलं. त्यावर तरूणाचा सही आणि अंगठा घेतला.

आपल्यासोबत अचानकपणे घडलेला हा प्रकार पाहून तरुण घाबरून गेला. सोबतच्या तीन जणांनी त्याला ५ लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसै दिले नाही तर पोलिसांत तुझ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. घाबरलेल्या तरूणाने आरोपींना त्याच्याजवळ असलेले रोख ५० हजार रुपये दिले मात्र ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर एटीएम कार्डमधून जबरदस्तीने त्याच्याकडून ३० हजार रुपये काढून घेतले.

आपल्यासोबत झालेल्या या प्रकाराने घाबरलेला तरूण कसाबसा आपल्या घरी पोहोचला. पण त्यानंतरही त्याला उर्वरित पैशांकरिता आरोपींकडून सातत्यानं पैशांसाठी मागणी होऊ लागली आणि पैसे न दिल्यास धमक्या दिल्या जाऊ लागल्या. त्यामुळे अखेर तरूणाने कोंढवा पोलीस ठाणे गाठत आपबिती सांगितली आणि फिर्याद दिली. तरुणाने फिर्याद दिल्यानंतर कोंढवा पोलिसांनी प्रगती इन्स्टाग्राम आयडी असणाऱ्या महिलेसह तिच्या ३ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर विक्रमी वेळेत पोलिसांनी महिलेसह तिच्या साथीदारांना गजाआड केले आहे .


शेअर करा