जिच्याशी प्रेमसंबंध तिच्याशीच केले लग्न मात्र पुढील चार दिवसात घडले सर्व ‘ अनाकलनीय ‘ : कुठे घडली घटना ?

शेअर करा

तो कोचिंग क्लासमध्ये कॉमर्सचे क्लास काम घेत होता तर ती एका मोठ्या कंपनीत एचआर होती. याच दरम्यान त्यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र काही कारणामुळे त्यांना तब्बल चार वर्ष लग्न करता आले नाही. २९ जूनला त्यांनी लग्न केले मात्र प्रेमविवाहानंतर अवघ्या चार दिवसांत दोघांनीही एकापाठोपाठ आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

लग्नानंतर पतीनं रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पत्नीनं पत्नीनं गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. दिल्लीजवळील गाझियाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून मयत तरुणाचे नाव विशाल तर त्याच्या पत्नीचे नाव निशा आहे

२९ जूनला दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीनं ते विवाहबंधनात अडकले होते. दोघे लग्नात अतिशय आनंदात होते .लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी विशाल घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडला. तो संध्याकाळपर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसात माहिती दिली काही वेळातच पोलिसांना एक मृतदेह सापडला. तो मृतदेह विशालचा असल्याचं समोर आलं.गाझियाबादमधल्या कवीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे

विशालचा मृत्यू झाल्यावर त्याची पत्नी असलेल्या निशाला याचा मोठा धक्का बसला आणि ती कोणाशीच काही बोलली नाही. तिनं रात्री गळफास लावून आत्महत्या करत आपला जीवनप्रवास संपवला. लग्नाआधी ४ वर्षे प्रेमसंबंध असलेल्या निशा आणि विशालनं उचललेल्या टोकांच्या पावलांमुळे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


शेअर करा