‘ तालिबान आधी महिलांना मारते आणि त्यानंतर..’, महिलेचा खळबळजनक दावा

शेअर करा

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानने महिलांच्या अधिकारांसंदर्भात आपली भूमिका शिथिल केल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात मात्र असे झालेले अद्यापपर्यंत दिसत नाही किंवा होण्याची देखील शक्यता दिसत नाही. तालिबानच्या हल्ल्यातून जीव वाचलेल्या एका महिलेने तालिबानच्या क्रुरतेची जी कहाणी सांगितली, ती ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही . महिलेच्या म्हणण्यानुसार तालिबानचे क्रूरकर्मा सैनिक आधी महिलांना मारून टाकतात आणि त्यानंतर त्यांचे तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घालतात.

एक टीव्ही चॅनलच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात गेल्या वर्षी तालिबानच्या दहशतवाद्यांनी 33 वर्षीय खतेरा यांना गोळी मारण्यात आली होती. या हल्ल्यात त्या कशाबशा वाचल्या त्यानंतर खतेरा यांनी सांगितले की, तालिबानच्या दृष्टीने महिला केवळ मासाचा पुतळा आहे, ज्यांच्यात जीव नाही, त्यांना केवळ मारहाण केली जाते. हल्ल्यानंतर त्यांचे डोळे काढले जातात ‘. नोव्हेंबर 2020 पासून खतेरा त्यांचे पती आणि मुलासह दिल्लीत उपचारासाठी राहत आहेत

खतेरा यांच्या म्हणण्यानुसार, ‘ त्यांचे वडील तालिबानचे एक दहशतवादी होते. त्यांनी खतेरावर हल्ल्याचा कट रचला होता. खतेरा अफगाणिस्तान पोलिसांत काम करत होत्या. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्या गर्भवती असतानाच तालिबानने त्यांना प्रचंड मारहाण केली होती. ड्यूटीवरून घरी जाताना त्यांना तीन तालिबानी दहशतवाद्यांनी रोखले होते. यानंतर त्यांनी खतेरा यांचा आयडी तपासला आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांना आठ गोळ्या लागल्या मात्र त्यानंतर देखील त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले होते. यानंतर त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यावर चाकूने वार केले आणि त्यांना मरण्यासाठी सोडून दिले.

खतेरा पुढे म्हणतात, ‘ तालिबान महिलांसोबत अतिशय क्रुरपणे वागते. कधी-कधी महिलांना मारून त्यांचे तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घातले जाते. मी नशीबवान आहे की मी यापासून वाचले. अफगाणिस्तानात तालिबानच्या अधिपत्याखालीच रहावे लागते. येथे महिला, मुलं आणि अल्पसंख्यकावर काय काय अत्याचार केले जातात, याची कल्पना करणेही अवघड आहे ‘

महिला नेत्या सलीमा माझरी देखील ताब्यात

अफगाणिस्तानातील सत्तासंघर्षात तालिबानविरोधात हातात शस्त्र घेणाऱ्या महिला नेत्या सलीमा माझरी यांना ताब्यात घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून त्यांच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सलीमा या अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गव्हर्नर आहेत ज्यांनी गेल्या काही काळापासून तालिबान्यांच्या विरोधात लढा दिला. तालिबान्यांना रोखण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सलीमा माझरी यांनी स्वतःची सेना तयार केली होती. तालिबान्यांनी बल्ख प्रांतामधून सलीमा यांना ताब्यात घेतलं आहे त्यानंतर त्यांच्याबद्दल अद्यापपर्यंत कोणतेच वृत्त आलेले नाही.

अफगाणी नागरिकांना तालिबानी शासनाचा आधीचा अनुभव असल्यामुळे त्यांना अफगाणिस्तानमध्ये राहायचं नाहीय. त्यांना कुठल्याही परिस्थितीत देश सोडायचा आहे. तालिबानचं सैन्य फक्त 60 हजारांच होत आणि अफगाण सरकारकडे होते 3 लाखांहून जास्त सैनिक होते. तालिबानकडे होती लुटलेली, जुनी शस्त्रं होती तर अफगाण फौजांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती. पण असं असून फक्त 72 तासांमध्ये तालिबानने एकेक करत डझनभर शहरांवर ताबा मिळवत काबूल गाठलं . तालिबानचा आत्मविश्वास आजच्या परिस्थितीत वाढलेला असला तरी तालिबानच्या जुलमी इतिहासामुळे नागरिक भयभीत झालेले असून मिळेल त्या पद्धतीने देश सोडून जात आहेत.


शेअर करा