बलात्काराचा गुन्हा मागे घेतो दोन लाख दे , मुलाच्या वडिलांचा ‘ असा ‘ निर्णय की..

शेअर करा

तुमच्या मुलावर दाखल झालेली बलात्काराची केस मागे घेतो त्यासाठी दवाखान्याचा खर्च व दोन लाख रुपये द्या,अशा मागणीचा तगादा व बदनामी सहन न झाल्याने आईवडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राजूरनजीक चिंचवणे इथे मुलाच्या आई वडिलांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दीपक सोमनाथ कुलाळ (वय 22 ) याने याबाबत राजूर पोलिसांत फिर्याद दिली असून आरोपी शीतल रामा मुठे व तिचे वडील यांनी माझा भाऊ व आई वडिलांवर बलात्काराची केस दाखल केली होती मात्र ही केस मागे घेतो परंतु त्यासाठी दवाखान्याचा खर्च व दोन लाख रुपये द्या, असा तगादा आरोपींकडून सुरू होता .

सातत्याने होत असलेल्या या त्रासाला वैतागून बदनामी व भीती सहन न झाल्याने फिर्यादी दीपक कुलाळ याचे वडील सोमनाथ नामदेव कुलाळ (वय 50 ) जिजाबाई सोमनाथ कुलाळ (वय 45) रा चिंचवणे ता.अकोले यांनी आपल्या राहत्या घरात लोखंडी पाइपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी दीपक कुलाळ याचा दुसरा भाऊ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा यापूर्वी दाखल असल्याने सध्या त्याचा भाऊ सध्या जेलमध्ये आहे. त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

तक्रारीनंतर भादवि कलम 306,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने,सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी घटनास्थळी भेट दिली असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे हे करत आहेत. १७ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. ( पत्रकार ललित झाम्बर मुतडक यांचेकडून )


शेअर करा