महिलांनी तस्करीसाठी गुप्तांगात लपवल्या होत्या सोन्याच्या पुड्या मात्र ? : मुंबईतील घटना

शेअर करा

चोरी करण्यासाठी कोण काय डोके लावेल याचा नेम राहिलेला नाही. अशीच एक घटना मुंबईत उघडकीस आली असून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन महिलांनी चक्क गुप्तांगात सोने लपवून आणले होते . सदर आरोपी तिन्ही महिला ह्या केनियाच्या असून त्यांना अटक करण्यात एनसीबीला यश आलं आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. तीनही महिलांनी चक्क गुप्तांगात सोन्याच्या पुड्या लपवल्या असल्याचे आढळून आले आहे .

सदर महिला अशा प्रकारे सोने घेऊन येत असल्याचं माहिती गुप्त सूत्रांच्या माध्यमातुन एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विमानतळावर सापळा रचला . तीन महिला विमानतळावर येताच एनसीबी टीम ऍक्टिव्ह झाली या या तीनही महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता तस्करीचा हा अजब प्रकार उघडकीस आला. सोनं तस्करी ही कारवाई कस्टम विभागाशी संबंधित असल्याने या तीन महिलांना कस्टमच्या हवाली करण्यात आलं आहे.

समीर वानखेडे यांना काही महिला परदेशातून ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार समीर वानखेडे आणि त्यांचं पथक विमानतळावर पाळत ठेवून होतं. तीन महिला आल्या असता त्यांना ताब्यात घेण्यात आलं मात्र काही वेळातच महिलांनी त्रास होत असल्याचे सांगितले आणि त्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यात आले आणि तिथे त्यांचे पितळ उघडे पडले.

महिलांनी त्यांच्या गुप्तांगात वस्तू लपवली असल्याचे सांगताच डॉक्टर देखील हादरून गेले. डॉक्टरांच्या मदतीने त्या लपवलेल्या सोन्याच्या वस्तू काढण्यात आल्या. त्या तीन महिलांकडून तब्बल 938 ग्राम सोनं जप्त करण्यात आलं आहे. 13 पाकिटात सोन्याचे 17 तुकडे लावण्यात आले होते. हे तुकडे 20 ग्राम ते 100 ग्रामचे होते. एनसीबीने वेळीच कारवाई केल्याने महिलांचा जीव वाचवण्यात यश आले आहे .


शेअर करा